आयपीएल 2023 मध्ये शनिवारी दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होईल. मागील तीन सामन्यांपासून विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईला या सामन्यात विजय अनिवार्य आहे. मात्र, चेन्नईच्या होम ग्राउंडवर मागील तेरा वर्षापासून मुंबईची हुकूमत असल्याचे दिसते.
CSK Vs MI at the Chepauk in the last 5 matches:
– MI won.
– MI won.
– MI won.
– MI won.
– MI won.– The home away from home for Mumbai Indians! pic.twitter.com/2v21mmUhS4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 6, 2023
मुंबई इंडियन्स सलग दोन विजय मिळवल्याने आत्मविश्वासाने भरलेला आहे. तर चेन्नईला सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले होते. लखनऊविरुद्धच्या सामन्यात आघाडीवर असताना देखील पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता. हंगामात याआधी झालेल्या सामन्यात मुंबईला मुंबईच्या मैदानावर पराभूत करण्याची किमया केलेली. असले तरी मुंबई इंडियन्सने चेन्नईला देखील त्यांच्या मैदानावर नेहमीच त्रस्त केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा विजय 2010 मध्ये मिळवला होता. त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सने एकदाही चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवू दिला नाही. 2012, 2013, 2015 व 2019 मध्ये दोनदा मुंबईने चेन्नईला चेपॉक स्टेडियमवर पराभूत केले आहे. हा तब्बल तेरा वर्षांचा वनवास संपवण्याचा प्रयत्न चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात करताना दिसेल.
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे.
मुंबई इंडियन्स संभाव्य इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल.
(Mumbai Indians Unbeatable At Chenai Super Kings Home Ground Chepauk Since 2010)