---Advertisement---

पुन्हा एकदा मुंबई-गुजरात समोरासमोर! वानखेडेवर रंगणार महत्वपूर्ण गुणांसाठी निर्णायक लढत

On: शुक्रवार, मे 12, 2023 12:17 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मधील 57 वा सामना शुक्रवारी (12 मे) खेळला जाईल. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेला गुजरात टायटन्स व चौथ्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्स हे सगळे संघ भिडतील. या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ्समधील आपले स्थान पक्के करण्याचा निर्धार गुजरातचा असेल. तर, हा विजय मिळवून पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा मुंबईचा प्रयत्न असणार आहे.

सध्या गुणतालिकेत गुजरात 16 गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. आजचा सामना जिंकल्यास ते अधिकृतरित्या प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. दुसरीकडे मुंबईला हा सामना जिंकून आपली गुणसंख्या 14 पर्यंत नेता येईल. त्यामुळे त्यांच्यासाठी प्ले ऑफची समीकरणे सोपी होतील. मात्र, हा सामना गमावल्यास मुंबईला पुढील दोन्ही सामन्यात मोठे विजय मिळवावे लागतील.

पूर्वी दोन्ही संघ आयपीएल 2023 मध्ये याआधी समोरासमोर आले होते. त्यावेळी गुजरातने मुंबईवर दणदणीत मात केलेली. फलंदाजांनी 207 धावा उभ्या केल्यानंतर फलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना 55 धावांनी विजय मिळवून दिला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याचा मुंबई प्रयत्न करेल.

वानखेडे स्टेडियम येथील या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा आपल्या फलंदाजांकडून अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे गुजरात आपला समतोल राखत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

(Mumbai Indians v Gujarat Titans IPL 2023 Match 57 Preview)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंच्या आंदोलनाची धग बीसीसीआयपर्यंत! ‘या’ प्रकरणात मिळाली नोटीस, वाचा सविस्तर 
धोनी-रैनाच्या विक्रमाचा पाठलाग करतोय यशस्वी! केकेआरला चोपत जडेजाला सोडले मागे 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---