---Advertisement---

‘पांड्या बंधूं’ची अबु धाबीमध्ये धमाकेदार एन्ट्री, लग्जरी कारमधून मुंबई इंडियन्सच्या हॉटेलमध्ये पोहोचले

---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी संघ यूएईत दाखल होत आहेत. उर्वरित सामन्यांसाठी हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या हे दोघे अबू धाबीमध्ये दाखल झाले आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हे दोघे त्यांच्या हटके स्टाइलमध्ये दिसत आहेत. व्हिडिओत हे दोघ हाॅटेलमध्ये एंट्री करताना दिसत आहेत. मुंबईचा संघ यूएईत असून संघासोबत सामील होण्यासाठी पांड्या बंधूही आता यूएईत दाखल झाले आहेत

हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांंड्या या दोघांनी ज्याप्रकारे त्यांच्या हटके स्टाइलमध्ये अबू धाबीमधील एका हाॅटेलमध्ये एंट्री केली आहे, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईचा संघ १३ ऑगस्टला यूएईमध्ये दाखल झाला आहे. संघाने २० ऑगस्टपासून अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सराव सुरू केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTBkuEDJRfF/?utm_source=ig_web_button_share_sheet

हार्दिक पांड्याने त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर पांड्या बंधू सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ट्विटरवर ते चांगलेच ट्रोल होत आहेत. वापरकर्त्यांनी हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. मागच्या काही काळापासून पांड्या बंधू खेळात काही कमाल करू शकलेले नाहीत. चाहत्यांनी एकप्रकारे तोच राग या पोस्टच्या माध्यामातून व्यक्त केल्यासारखे वाटत आहे.

आयपीएल २०२१ च्या १४ हंगामातील भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याचे प्रदर्शन काही चांगले दिसले नव्हते. त्याने ७ सामन्यांत केवळ ५२ धावा केल्या आहेत. त्याने या धावा केवळ ८.६६ च्या सरासरीने केल्या आहेत. या सामन्यांमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या १६ आहे. आयपीएलचा हा हंगाम हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्यासाठीही काही विशेष चांगला गेला नाही. त्याने या हंगामातील ७ सामन्यांत १०० धावा केल्या आहेत आणि ३ विकेट घेतल्या आहेत.

१९ सप्टेंबरला यूएईमध्ये आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या ‘या’ गोलंदाजाची केकेआरमध्ये एन्ट्री, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

पंजाब किंग्जला मजबूती, १४ कोटींच्या खेळाडूच्या जागी इंग्लंडच्या ‘या’ श्रेयस्कर गोलंदाजांची निवड

भरवशाचे फलंदाज फॉर्मात नसूनही ‘ही’ घोडचूक कशी केली? दिग्गजाने कोहली अन् शास्त्रींचा फटकारले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---