आयपीएल 2023 चे वारे सध्या वाहू लागले आहेत. येत्या 23 तारखेला बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा आयोजित केला आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी होणार आहेत. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स मागच्या हंगामात चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर संघाला खेलाडूंच्या लिलावात गरजेप्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दोन खेळाडूंची नावे सांगितली आहेत, ज्यांनी मुंबई इंडियन्सला आगमी आयपीएल हंगामात गरज असेल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indias) संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण संघासाठी मागचा आयपीएल हंगाम एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता, असे म्हणूने चुकीचे ठरणार नाही. कारण मुंबई इंडियन्सने या हंगामातील त्याच्या 14 सामन्यांपैकी 10 सामने गमावले होते आणि संघ प्लेऑफ्समध्ये जागा मिळवू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर मुंबई फ्रँचायझीने आयपीएल 2023 पूर्वी संघातील 13 खेलाडूंना रिलीज केले आणि लिलावात त्यांना सर्वात जास्त खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत.
23 डिसेंबर रोजी होणाऱ्या खेळाडूंचा लिलापूर्वी संघाला रणनीती बनवावी लागणार आहे, तसेच गोलंदाजी विभाग भक्कम करण्याच्या दृष्टीने खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. आगामी हंगामात जसप्रीत बुमराह याच्या साथीला इंग्लंडचा जोफ्रा आर्चर () संघात सामील होईल, अशी फ्रँचायझी आणि चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु संघात फिरकी गोलंदाजांची कमी असल्यामुळे या विभागावर काम करणे गरजेचे आहे. संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या मते मुंबईने लिलावात ऍडम जम्पा (Adam Zampa) आणि आदिल राशिद (Adil Rashid) यांना संघात सामील केले पाहिजे.
माध्यमांशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “प्रत्येक आयपीएल संघाला राशिद खानसारख्या खेळाडूची गरज असते. त्यांना एकतर राशिद खान हवा असतो किंवा सुनील नरेस. एडम जम्पा किंवा आदिल राशिद लेग स्पिनर आहेत आणि ते संघात जागा मिळवण्यासाठा दावेदार आहेत. मागच्या हंगामातील त्यांचे प्रदर्शन पाहत बाकी सर्व गोष्टी ठीक वाटत आहेत.”
“हो त्यांना फिरकी गोलंदाज हवा आहे. त्यांनी मुर्गन अश्विनला सोडले. मुंबई संघाकडे लेग स्पिनर खेळाडूंचा इतिहास आहे. त्यांच्याकडे मार्कंडे देखील होता. राहुल चाहरला त्यांना रिलीज केले नव्हते पाहिजे. त्यांचा हा निर्णय चुकीचा होता आणि आता त्यांना काही विदेशी फिरकीपटूंची गरज भासणार आहे. तरबेज शम्मी देखील एक फिरकी गोलंदाज आहे, जो मुंबईसाठी गरजेचा असू शकतो,” असे मांजरेकर म्हणाले. (Mumbai Indians will bid to buy these two players in the auction, claims Sanjay Manjrekar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध करू शकतो संघपुनरागमन
भारताला धक्का! राहुलला प्रॅक्टिसवेळी मोठी दुखापत, संघाबाहेर पडताच ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व