आयपीएलच्या 18व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या हंगामाची सुरुवात (22 मार्च) पासून होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (24 मार्च) रोजी खेळणार आहे. दोन्ही संघ चेन्नई येथील चेपाॅक स्टेडियमवरती समोरासमोर असणार आहेत. मुंबई इंडियन्स आपला पहिला घरेलु सामना (31 मार्च) रोजी वानखेडे स्टेडियमवरती खेळणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघ असणार आहे.
वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स आपला दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (4 एप्रिल) ला खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत असणार आहे. हा सामना (7 एप्रिल) रोजी होईल. या सामन्यानंतर वानखेडे स्टेडियमवरती (17 एप्रिल) रोजी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ समोरासमोर असणार आहेत.त्याचबरोबर मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमवरती पुढचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध (6मे) ला खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स हंगामाचा शेवटचा सामना (6 मे) रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.
शक्यता आहे की, आयपीएल 2025 चा पहिला सामना व हंगामाचा शेवटचा सामना देखील ईडन गार्डन्स मध्ये खेळला जाईल.आयपीएल 2025 मध्ये 13 शहरात 10 संघांच्या मध्ये एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Birthday; एबी डिव्हिलियर्सच्या विस्फोटक फलंदाजीचे 3 विक्रम, जे आजही अभेद्य आहेत!
Champions Trophy: भारताला दुबईमध्ये कशी खेळपट्टी मिळेल? कोणत्या गोलंदाजांना मिळणार मदत?
पाकिस्तानने ओलांडले नीचपणाच्या सर्व मर्यादा, कराची-लाहोर स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नाही…