यंदाचा महिला प्रीमियर लीगचा (Women Premier League 2025 Final) फायनल सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलच्या ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (Mumbai Indians Won Wpl 2025 Tital)
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटपर्यंत झुंज दिली परंतु. 8 धावांनी त्यांचा पराभव झाला. सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला, परंतु कर्णधार मेग लॅनिंगच्या दिल्लीला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. टाॅस गमावल्यानंतर मुंबई संघ प्रथम फलंदाजीला आला. खराब सुरुवातीनंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी 89 धावांची भागीदारी करून मुंबईचा संघ स्थिरावला. एकीकडे, हरमनप्रीतने 66 धावांची खेळी केली, तर दुसरीकडे, सायव्हर-ब्रंटने 30 धावांची खेळी खेळली.
मुंबई इंडियन्सने WPL चे विजेतेपद जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. त्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला होता. तर यावेळी दिल्लीला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान मुंबई इंडियन्सने इतिहास रचला. मुंबई हा एकमेव संघ आहे जो डब्ल्यूपीएलच्या इतिहासात दोनदा चॅम्पियन बनला आहे. (Mumbai Indians Won Second WPL Tital)
दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-
मुंबई इंडियन्स- हेली मैथ्यूज , यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक ), नॅट सायवर ब्रँट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना , अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, सायका इशाक, अमेलिया केर, जी कमिलिनी, शबनिम इस्माईल
दिल्ली कॅपिटल्स- मेग लॅनिंग ( कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, एनाबेल सदरलँड, मारिजान कप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (यष्टीरक्षक) निकी प्रसाद, मिन्नू मनी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी