शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. यासह मुंबईने प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या. राजस्थानकडून मिळालेले ९१ धावांचे आव्हान मुंबईने ८.२ षटकातच पूर्ण केले. त्यामुळे मुंबईने खास विक्रम केले आहेत. पण या सामन्यासाठी मुंबईच्या ११ जणांच्या संघात कृणाल पंड्याचा समावेश नव्हता.
आयपीएलमध्ये धावांचे लक्ष्य मुंबईने दुसऱ्यांदा १० षटकांच्या आत पूर्ण केले. यापूर्वी २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले ६८ धावांचे आव्हान ५.३ षटकांत पूर्ण केले होते. त्यामुळे दोनवेळा असा पराक्रम करणारा मुंबई पहिला संघ ठरला. याशिवाय युएईमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात जलद लक्ष्याचा पाठलाग करण्याचाही विक्रम केला.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने कृणाल पंड्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नसताना अशाप्रकारे विक्रमी कामगिरी करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जेव्हा शेवटच्या वेळी कृणाल पंड्या मुंबई इंडियन्स संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नव्हता, तेव्हा मुंबईने आयपीएलमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. हा विक्रम २०१७ सालच्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध मुंबईने केला होता. त्यानंतर आत्तापर्यंत कृणाल जवळपास मुंबईच्या सर्वच सामन्यांत खेळला.
पण, कृणालची यंदाच्या आयपीएल हंगामातील कामगिरी फारच वाईट झाली आहे. त्यामुळे त्याला सातत्याने संघातून बाहेर बसवण्याची मागणी चाहत्यांकडून करण्यात येत होती. अखेर मंगळवारी कृणालऐवजी मुंबईने न्यूझीलंडच्या जिमी निशामला संधी दिली. विशेष म्हणजे निशामनेही मुंबईला निराश न करता ३ विकेट्स मिळवून दिल्या.
अशा अनेक कारणांमुळे मंगळवारी मुंबईच्या विजयानंतर कृणालचे नाव सोशल मीडियावर ट्रेंडिंग होते. अनेक सोशल मीडिया वापरकर्ते मीम शेअर करत त्याला ट्रोल करत होते. एका युजरने ‘क्या इतना बुरा हूँ मैं’, असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे. तर, अनेकांनी काही गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या.
Last 2 matches, When Krunal not part of MI XI
– MI Registered Fastest Chase ever In UAE (2021 v RR)*
– MI Registered their Highest IPL Score (2017 v KXIP)#MIvRR
— S H E B A S (@Shebas_10) October 5, 2021
#MumbaiIndians #RRvMI
Krunal pandya dropped from the team and #mi won by great margin #Krunalpandya be like: pic.twitter.com/ATCVji2ry5— Ayush kumar (@ayush_07kumar) October 5, 2021
https://twitter.com/Azim_tweets/status/1445426417856958468
https://twitter.com/developer_being/status/1445428625545711619
Thanks ki aaj #Krunalpandya nahi aahey
— Tushar Vandana Venkatesh Tari ❁ (@TusharVTari) October 5, 2021
Memers when they can't troll Krunal Pandya..!!#MIvsRR #RRvsMI #mi #rr#IPL2O21 #Krunalpandya pic.twitter.com/fFwXAJ8nk3
— Niviii (@N_V__03) October 5, 2021
"Tum Logo ke Memes ke chakkar mein Mujhe Team se Nikal Diya"
~ #KrunalPandya#MIvsRR pic.twitter.com/1Pho1f9KPZ— Mayank Sachde ???????? (@MemeByMak) October 5, 2021
Krunal Pandya blaming Sanju Samson for ignoring lucky charm(himself) ahead crucial match.#Krunalpandya #MIvsRR pic.twitter.com/w4cjnHCCKd
— कुन्दन ???????? (@VibhutiShivsag2) October 5, 2021
https://twitter.com/VibhutiShivsag2/status/1445451997209972736
मेरे बिना खेला करो ….. जीत जाओगे ….. समझ गए ?@mipaltan #MumbaiIndians #IPL2021 @IPL @krunalpandya24 #Krunalpandya pic.twitter.com/LveAsLuAjz
— Anand Yadav (@anand21y) October 5, 2021
मुंबईसाठी विजय ठरला महत्त्वाचा
राजस्थानविरुद्धचा सामना मुंबई संघासाठी करो या मरो अशा परिस्थितील सामना होता. पण, मुंबईने हा सामना जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबईचे सध्या गुणतालिकेत ६ विजयांसह १२ गुण झाले आहेत. ते सध्या ५ व्या क्रमांकावर आहेत.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व ठेवले. त्यामुळे राजस्थानला २० षटकांत ९ बाद ९० धावाच करता आल्या.
राजस्थानकडून एविन लूईसने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने २० धावांचा टप्पा ओलांडला नाही. मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जिमी निशामने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून इशान किशननेही अफलातून कामगिरी केली. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. तसेच रोहित शर्माने २२, सूर्यकुमार यादवने १३ आणि हार्दिक पंड्याने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान आणि चेतन साकारीयाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ झालं! मुंबईने ९ षटकातच विजय मिळवल्याने राजस्थानवर ओढावली नामुष्की






