आयपीएल 2024 मध्ये पाचवा सामना हा मुंबई इंडियन्सविरूद्ध गत उपविजेता संघ गुजरात टायटन्स याच्यात होत आहे. तसेच या सामन्यात दोन्ही संघाचे नवीन कर्णधार असणार आहेत. तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असून या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघ एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्हा संघांमध्ये बरोबरीची लढाई राहिली आहे. मुंबई आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. तसेच गुजरातने या स्टेडियममध्ये खेळलेल्या 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच मुंबईची या मैदानातील आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे.
दरम्यान, या सामन्यात जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. तर रोहित शर्मा फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11- हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह ,ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11- शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
महत्त्वाच्या बातम्या-