पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात मुंबई खिलाडीज संघाने तेलगु योद्धाज संघावर 8 गुणांच्या2 फरकाने विजय मिळवला.तर पहिल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू जगन्नाथ दास याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्स संघाने चेन्नई क्विक गन्स संघावर 6 गुणांच्या फरकाने विजय मिळवताना अव्वल स्थानी झेप घेतली. त्याचबरोबर चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्याची त्यांनी परतफेड केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुर्वेश साळुंखे आणि अविक सिंगा यांनी सुरेख कामगिरी करत अनुक्रमे 14 व 8 गुणांची कमाई करत मुंबई खिलाडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
मुंबई संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले व पहिल्या डावात 18 गुणांची आघाडी घेतली.पिछाडीवर असलेल्या तेलगु योद्धाज संघाने ही पिछाडी भरून काढत सामन्यात 26-26 अशी बरोबरी साधली.
लीगमधील सर्वात भक्कम बचावफळी असलेल्या मुंबई संघाने पुन्हा एकदा सुरेख खेळ करत आपला बचाव अभेद्य ठेवला. मुंबईच्या दुसऱ्या तुकडीने अभिषेक पाथरोडे, कर्णधार विजय हजारे, श्रीजेश एस यांनी 3मिनिटापेक्षा अधिक काळ मॅटवर संरक्षण केले.
त्यानंतर पुढच्या तुकडीत गजानन शेनगलने नाबाद राहत 2मिनिटे 23 सेकंद टिकून मुंबई खिलाडीज संघाला तेलगु योद्धाज वर 54-46 असा विजय मिळवून दिला. तेलगु योद्धाजकडून अवधूत पाटीलने 10 गुणांची कमाई करत एकाकी झुंज दिली.
याआधीच्या सामन्यात जगन्नाथ दासने तिसऱ्या सत्रात 3मिनिटे 42 सेकंद संरक्षण करताना गुजरातला 6 बोनस गुण मिळवून दिले. त्याच्या कामगिरीमुळे चेन्नईला तिसऱ्या संत्रा अखेर 42-32 अशी केवळ 10 गुणांची आघाडी घेता आली. त्यानंतर चौथ्या निर्णायक सत्रात दास यानेच चेन्नई चा प्रमुख सरंक्षक महेश शिंदेला अप्रतिम स्काय डाईव्हच्या सहाय्याने बाद करून गुजरातला निर्णयक क्षणी आघाडी मिळवून दिली. गुजरातने हा सामना 50-44 असा जिंकला. दासने आक्रमणात 5 गुण तर सुयश गरगटे 8 गुण मिळवताना गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी गुजरातचा कर्णधार रंजन शेट्टीने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारल्यावर 8 बोनस गुण मिळवले. इतकेच नव्हे तर चेन्नईला पहिल्या सात मिनिटाअखेर 19 गुणांवर रोखले. निलेश जाधव आणि अभिनंदन पाटील यांनी अनुक्रमे 3मिनिटे 6 सेकंद व 3मिनिटे 3सेकंद संरक्षण केले.
दुसऱ्या सत्रात चेन्नईच्या कर्णधार अमित पाटीलने 3मिनिटे 12 सेकंद संरक्षण करताना 4बोनस गुण मिळवले. मात्र गुजरातने चेन्नईचे 18 गडी बाद करताना पहिल्या डावा अखेर 26-23 अशी निसटती पण महत्वपूर्ण आघाडी घेतली.
रात्री उशिरा मुंबई खिलाडीज विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात सामना होणार आहे.अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
खास सामन्याआधी विराटला आल्या आफ्रिकेतून शुभेच्छा! जिगरी यार एबी म्हणतोय…
आठ वर्षांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाची मालिका टीम इंडिया सुरूच ठेवणार? वाचा ही आकडेवारी
ASIA CUP: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर उत्सुक; शेअर केलाय खास फोटो