प्रो कबड्डीमधील सर्वात महागडी आणि नेहमीच चर्चेत असणारी टीम यु मुंबा आपले बस्तान मुंबई बाहेर हलविणार असल्याचे वृत्त आहे. स्टेडियमचा मुंबईमधील खर्च परवडत नसल्यामुळे हा संघ आता नाशिकला आपले होम ग्राऊंड करु शकतो.
यु मुंबा २०१४ आणि २०१६ची उपविजेती असून २०१५मध्ये त्यांनी आपले पहिले आणि एकमेव विजेतेपद जिंकले होते.
या लीगमध्ये मैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या यु मुंबाला आर्थिक गोष्टींमध्ये मात्र म्हणावे तसे यश खर्च जास्त असल्यामुळे येत नाही.
मुंबई शहरात जी काही इनडोअर स्टेडियम आहेत त्यामध्ये योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे संघाला नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय)वरच सामने आयोजीत करावे लागतात. याचा एका दिवसाचा खर्च २५ लाख रुपये आहे. हा खर्च संघव्यवस्थापनाला खूप वाटतो आहे.
तसेच जर मुंबई लेगचे सामने १० दिवस चालले तर संघाला यासाठी तब्बल २.५ कोटी रुपये द्यावे भाड्यापोटी द्यावे लागतात.
याचमुळे हे सामने आता मुंबईमधून नाशिक शहरात हलविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
बाॅलीवूड चित्रपट निर्माते रोनी स्कृवालांच्या कंपनीकडे या संघाची मालकी आहे.
“आमच्यासमोर काहीच पर्याय नाही. मुंबईचे सामने दुसऱ्या शहरात होणार आहे हे नक्कीच वाईट आहे. परंतु आम्ही काही करु शकत नाही. आम्ही शहरातील अन्य स्टेडियम देखील पाहिले आहेत. परंतु त्यांमध्ये मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध नाही. ” असे संघाचे सीइओ सुप्रतिक सेन मुंबई मिररशी बोलताना म्हणाले.
“एनएससीआय स्टेडियमचा एका दिवसाचा खर्च तब्बल २५लाख आहे तर नाशिकमधील मिनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियमचा एका दिवसाचा खर्च केवळ १५ हजार आहे. यामुळे हे गणित यु मुंबासाठी जुळणारे आहे.” असेही ते म्हणाले.
नाशिकमधील स्टेडियमवर एकावेळी २५०० प्रेक्षक बसु शकतात तर NSCI ची क्षमता ३५०० प्रेक्षकांना सामावुन घ्यायची आहे.
हे सामने प्रेक्षक टेलिव्हीजनवर जास्त पहात असल्यामुळे मैदानावरील प्रेक्षक संख्या १ हजारने कमी झाली तरी विशेष फरक पडणार नाही.
प्रो कबड्डीची मालकी ज्या कंपनीकडे आहे ती अजूनही आशावादी आहे की हे सामने एनएससीआयलाच होतील. तसेच जर अन्य शहरात हे सामने होणार असेल तर त्यासाठी सर्वोत्तम इनडोअर स्टेडियमची व्यवस्था केली जाईल.
कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला