लवकरच देशतांर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेला (Ranji trophy) प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा जानेवारी महिन्यात सुरू होणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या २१ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi shaw) कडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) देखील या संघात स्थान देण्यात आले आहे.
अर्जुन तेंडुलकरची मुंबई संघात एन्ट्री
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील आता आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. सचिन तेंडुलकरने कित्येक वर्ष मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. आता हा वारसा अर्जुन तेंडुलकर पुढे घेऊन जाणार आहे. गतवर्षी अर्जुन तेंडुलकरची आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात निवड करण्यात आली होती. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला मुंबई इंडियन्स संघाने रिलीज केले होते.
पृथ्वी शॉ कडे संघाचे कर्णधारपद
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. अनेकदा संधी मिळूनही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अनेकदा त्याला संघाबाहेर करण्याची देखील मागणी केली गेली होती. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याचे खेळणे कठीण दिसून येत आहे. ज्यामुळे तो फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे.
अजिंक्य रहाणे सारख अनुभवी खेळाडू असताना देखील मुंबई संघाचे कर्णधारपद युवा पृथ्वी शॉ कडे सोपवण्यात आले आहे. सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा आयपीएल स्पर्धेपूर्वी होणार आहे. तर दुसरा टप्पा आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर खेळवण्यात येणार आहे.
असा आहे रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ :
पृथ्वी शॉ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अतर्डे, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डीयस आणि अर्जुन तेंडुलकर.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी
INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर
मोठी बातमी! आयपीएलमधील अहमदाबाद संघाचे नाव अखेर फायनल, पाहा काय झालंय नामकरण