पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स यांच्यात लढत झाली. पुणे संघ गुणतालिकेत पाचव्या तर मुंबई उपनगर संघ सहाव्या स्थानी होता. सामन्याचा पहिल्या चढाईत गुण मिळवत आकाश रुडेले मुंबई उपनगर संघाचा खात उघडला. तर पुणेच्या भूषण तपकीर ने आपल्या पहिल्याच चढाईत 4 गुणांची सुपर रेड करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला मुंबई उपनगर संघाला ऑल आऊट करत पुणे संघाने 9-1अशी आघाडी मिळवली.
मुंबई उपनगर कडून आकाश रुडेले व यश डोंगरे ने चपालाई ने चढाया करत मध्यांतरा पर्यत पुणे संघाला ऑल आऊट करत पिछाडी कमी केली. मध्यंतराला 19-17 अशी नाममात्र 2 गुणांची आघाडी पुणे संघाकडे होती. त्यानंतर पुणे कडे 30-22 अशी आघाडी असताना आकाश रुडेलेच्या आक्रमक खेळीने मुंबई उपनगर संघाने पुणे संघाला ऑल आऊट करत 31-30 अशी आघाडी मिळवली.
मुंबई उपनगर संघाने शेवटच्या 3 मिनीटात शांत व संयमी खेळ करत सामना 35-32 असा जिंकला. मुंबई उपनगर कडून आकाश रुडेले 9 गुण मिळवले. तर रजत सिंग ने 7 व यश डोंगरे ने 6 गुण मिळवले. पकडीत रोहित सिंग ने 3, आदित्य गजमल व रुतिक पाटील ने प्रत्येकी 2 पकडी केल्या. पुणेच्या भूषण तपकीरची 14 गुणांची खेळी मात्र व्यर्थ गेली. (Mumbai Suburban Murthal Magnets won in a close match)
बेस्ट रेडर- भूषण तपकीर, पुणे पलानी टस्कर्स
बेस्ट डिफेंडर- रोहित सिंग, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
कबड्डी का कमाल- आदित्य गजमल, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फॅन्टॅस्टिक फाफ! 38 व्या वर्षीही प्लेसिस घालतोय आयपीएलमध्ये धुमाकूळ, अविश्वासनीय सातत्याने राखलीये ऑरेंज कॅप
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाची ठाणे हम्पी हिरोजवर मात