देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफीचे उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. यादरम्यान मुंबई आणि बडोदा संघ आमनेसामने आहेत. ह्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात 10 आणि 11व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा 10 आणि 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी एकाच डावात शतके झळकावली आहेत. ही कामगिरी मुंबईच्या खेळाडूंनी केली असून त्यात एमएस धोनीच्या एका हुकमी एक्क्याचाही समावेश आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी ही ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली.
मुंबईच्या तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी बडोदा विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात इतिहास रचला आहे. तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करत वैयक्तिक शतके ठोकली आहेत. तनुष आणि तुषार या दोघांचं हे पहिलंवहिलं प्रथम श्रेणी शतक ठरले. दोघांनी तुफानी बॅटिंग करत बडोदा टीमच्या गोलंदाजांची पिसे काढली. या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली. तनुष आणि तुषारने या भागीदारीसह अनेक रेकॉर्ड उध्वस्त केले. ( Mumbai tanush Kotian tushar Deshpande become first No 10 and 11 to hit centuries in Ranji Trophy innings )
1946 नंतर प्रथमच असे घडले –
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 व 11 व्या क्रमांकावरील फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1946 साली इंडियन्स विरुद्ध सरे या लढतीत चंदू सर्वते (124*) व शुते बॅनर्जी (121) यांनी हा विक्रम केला होता. 48 वर्षानंतर असा पराक्रम घडला आहे.
Number 10 batter, Tanush Kotian – 120*(129)
Number 11 batter, Tushar Deshpande – 123(129)A rare moment in cricket with the last 2 batters of the team has scored hundreds for Mumbai. 🤯👌 pic.twitter.com/I6Ai3gKZuU
— Johns. (@CricCrazyJohns) February 27, 2024
Terrific Tushar 🔥
Mumbai’s Tushar Deshpande hit a blistering 123 (129) against Baroda in the 2nd innings to register the highest individual score by a No. 11 batter in #RanjiTrophy 🙌
Relive 📽️ his brilliant knock 🔽@IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/b9E2cfsNDv pic.twitter.com/S8RjqkNXjr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 27, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन – अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.
बडोदा प्लेईंग ईलेव्हन – विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.
अधिक वाचा –
– IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,”युवा…
– IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे
– IND Vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेल ठरला विजयाचा ‘हिरो’, अन् वाढल्या पंत-इशानच्या अडचणी