---Advertisement---

रणजीतील दमदार कामगिरीनंतर शार्दुल ठाकूरचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश होणार?

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2025 7:29 PM
---Advertisement---

टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेद्वारे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला त्यांचे प्लेइंग इलेव्हन निश्चित करावे लागेल. भारताची फलंदाजी उत्तम दिसत आहे. पण गोलंदाजीने अजून ती ताकद दाखवलेली नाही. गोलंदाजी कमकुवत दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती. दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 6 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.

शार्दुल ठाकूर हा मुंबईकडून हरियाणाविरुद्ध रणजी ट्रॉफी 2024-25 चा तिसरा क्वार्टर फायनल खेळत आहे. सामन्यातील हरियाणाच्या पहिल्या डावात शार्दुलने 6 विकेट्स घेत चमत्कार केला, ज्यामुळे हरियाणाचा संघ 301 धावांवर ऑलआउट झाला.

शार्दुलने 18.5 षटकांत 58 धावा देत 6 बळी घेतले. यादरम्यान त्याने 3 मेडन ओव्हर्सही टाकल्या. रणजी क्वार्टर फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात शार्दुलच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, संघांना 11 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करता येतील.

टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नाही. बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत त्याच्या तंदुरुस्तीबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त झाला नाही तर तो भारतासाठी मोठा धक्का असेल.

याशिवाय, संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद दुखापतीतून परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने तो खेळला, पण शमीला कोणतीही विशेष लय साधता आलेली नाही. याशिवाय हर्षित राणाने इंग्लंड मालिकेद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हर्षितने 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या, पण या दरम्यान तो महागडा ठरला.

हेही वाचा-

तिरंगी मालिकेत किवींचे वर्चस्व! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली
क्रिकेट इतिहासात नवा अध्याय! या खेळाडूनं पहिल्याच वनडेत गाठला अनोखा टप्पा
‘सामन्याच्या जोशात जीवनाची किंमत’, अहमदाबाद वनडेत BCCI राबवणार अनोखा उपक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---