आयपीएल 2023चा 35वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक रोहित शर्मा याने जिंकली आणि मुंबई संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी चांगले प्रदर्शन केले आहे. अशात या दोन बलाढ्य संघातील लढत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. मुंबईछा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिटनेसच्या कारणास्तव या सामन्यात खेळणार नाही.
A look at the Playing XIs of both sides 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/z2sPKaRfsx
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
(Mumbai won the toss and bowled first, but a key player out of the match)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साडेसात कोटींचा वेगवान गोलंदाज आयपीएल हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत, लखनऊ संघाची वाढली डोकेदुखी
हैदराबादचा सलग तिसरा पराभव कोच लाराच्या जिव्हारी; म्हणाला, ‘खेळपट्टीमध्ये गडबड नव्हतीच…’