---Advertisement---

Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास

Bat Ball
---Advertisement---

माटुंग्याच्या मेजर धाडकर मैदानावर सोमवारी (8 जानेवारी) एक धक्कादायक प्रकार घडला. क्षेत्ररक्षण करताना डोक्याला मार लागल्याने खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. मृत खेळाडूचे नाव जयेश सावला असून ते 52 वर्षांचे होते. विशेष म्हणजे शेजारच्या खेळपट्टीवरील फलंदाजाने मारलेला त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे जयेश यांचा मृत्यू झाला.

माध्यमांतील वृत्तांनुसार यजेश सावला (Jayesh Savla) ज्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, ते ठिकाण शेजारी सुरु असलेल्या सामनाच्या अगदी जवळ होते. हा सामना दादर पारसी कॉलनीच्या खेळपट्टीवर खेळला जात होता. शेजारच्या खेळपट्टीवरील फलंदाजाने जोरदार पूल शॉट मारला, जो सावला यांच्याच दिशेने येत होता. हा चेंडू डोक्यात लागण्याआधी त्यांना हालचार करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. हा चेंडू त्यांच्या डोक्याच्या मागे आमि कमाच्या बाजूला लागल्याचे समजते.

सावला हे एक व्यापारी असून अपघातानंतर त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्याचेही समजते.

सावला खेळत असलेली ही क्रिकेट स्पर्धा आठ सामन्यांची होती. याच स्पर्धेचा भाग असलेल्या रोहित गंगर याने अशी माहिती दिली की, “सोमवारी (8 जानेवारी) दुपारी स्पर्धेचे दोन सामने खेळले जात होते. एक सामना दादर युनियन येथे, तर दुसरा दादर पारसी कॉलनी एथे खेळला जात होता. सावला खेळपट्टीवर गाला रॉक्सकडून मास्टर ब्लास्टर्सविरुद्ध खेळत होते. ते पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होते आणि डीपीसीच्या फलंदाजाने त्यांच्या दिशेने पूल शॉट मारला. हा चेंडू त्यांच्या त्याच्या डोक्याच्या मागे लागले. ऑट्रेलियाच्या फिल ह्यूजला ज्याठिकाणी चेंडू लागला, अगदी त्याच ठिकाणी सावला यांनाही चेंडू लागला.”

या घटनेनंतर शहराताली क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी माटुंगा मैदानावरील वातावरण गढूळ होते. सकाळचे सराव सत्र या घटनेनंतर रद्द करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या – 
कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, वॉर्नरच्या जागी संघाला मिळाला अनुभवी सलामीवीर
मुजीब, फजल अन् नवीनचा परदेशी लीग खेळण्याचा मार्ग मोकळा, अफगाणिस्तान बोर्डाने उठवली बंदी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---