---Advertisement---

PBKS vs Mi: अहमदाबादच्या स्टेडियमवर मुंबईच्या खेळाडूंना रोखणे पंजाबसाठी अवघड, फायनलचं तिकीट जवळपास निश्चित!

On: रविवार, जून 1, 2025 6:47 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबचा सामना पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईशी होणार आहे (punjab kings vs mumbai indians) आणि या सामन्यात पंजाबसाठी मुंबईला थांबवणे कठीण असणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (narendra modi stadium) मुंबईचा विजय निश्चित दिसत आहे. हे आकडे सांगत आहेत. पंजाब मुंबईला सहजासहजी थांबवू शकणार नाही. गुजरातचा पराभव केल्यानंतर मुंबई पूर्ण तयारीने दिसत आहे. फलंदाजीमध्ये हिटमॅनचा (Hitman Rohit Sharma) फॉर्म परत आला, आहे तसेच बुमराह- बोल्टची (bumrah- boult) जोडी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) सुद्धा फॉर्ममध्ये आहे.

आयपीएल 2025 (IPL 2025) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आकडे मुंबईच्या विजयाची गॅरंटी देत आहेत. या मैदानावर संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये चारही वेळा मुंबईने सामना गमावला आहे पण मुंबई आज कोणत्याही परिस्थितीत सामना गमावणार नाही. ज्या प्रकारे त्यांनी गुजरातचा पराभव केला ते बघता पंजाबसमोर मुंबईचं मोठं आव्हान असणार आहे.

अहमदाबादमध्ये जर मुंबईला थांबवायचे असेल, तर पंजाबला जबरदस्त खेळ खेळावा लागेल. पंजाबने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 3 विजय प्राप्त केले आहेत.

एलिमिनेटर सामन्यात मुंबईचं जोरदार प्रदर्शन राहिलेलं आहे. संघाने एकतर्फी विजय मिळवत गुजरातला 20 धावांनी पराभूत केले. रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत 81 धावा केल्या होत्या. तसेच आजच्या सामन्यात देखील रोहितवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---