येत्या 3 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होत आहे. यामध्ये भारत पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यातील कसोटी मालिका भारतच्या दृष्टीने खूप महात्वाची आहे. भारताची इंग्लंडमधील कसोटी कामगिरी फारशी चांगली राहीली नाही.
यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर चाललेल्या भारतीय संघाचे लक्ष कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यावर असेल.
2014 इंग्लंड दौऱ्यात भारतीय गोलंजदाजाची कामगिरी चांगली झाली होती. भुवनेश्वर कुमारने पाच कसोटीत 19 विकेट्स मिळवल्या होत्या. तर इंग्लंडच्या जेम्स एॅडरसनने 25 विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र मुरली विजय वगळता भारताची फलंदाजी या मालिकेत कुचकामी ठरली होती.
याच पार्शभूमीवर भारताचा सलामिवीर मुरली विजयने इंग्लंड दौऱ्याविषयी पत्रकारांशी बातचीत केली बातचीत केली.
तो पत्रकारांशी बोलताना म्हणाला , ” इंग्लंड दौऱ्यावर जाताना तिथे चांगली कामगिरी करण्यासाठी मानसिक कणखरपणा उपयोगी पडतो. तुमच्या फलंदाजीतील कौशल्याला आत्मविश्वासाची जोड असेल तर इंग्लंडमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करण्यापासून कोणीचं रोखू शकणार नाही.”
2014 च्या कसोटी मालिकेत पाच सामन्यातील दहा डावात विजयने 40.20 च्या सरासरीने 402 धावा केल्या होत्या. जो रूट 518 आणि गॅरी बॅलेंस 503 यांच्यानंर या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी होता.






