भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या भज्जी ब्लास्ट या कार्यक्रमाचे भाग गेल्या महिन्यापासून प्रसिद्ध होत आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सच्या खेळाडूंच्या मुलाखती घेणे या कार्यक्रमाची थीम आहे. यापूर्वी अंबाती रायडू, सुरेश रैना आणि शेन वॅटसन या खेळाडूंच्या मुलाखती या क्रार्यक्रमातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यातून त्यांच्या आयुष्यातील आणि क्रिकेट कारकिर्दीतील आपल्याला माहीत नसलेले अनेक पैलू अणि घटना समोर आल्या आहेत.
भज्जी ब्लास्ट कार्यक्रमातून भारताचा कसोटी स्पेशेलिस्ट सलामीवीर मुरली विजयची मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली.
त्यामधून विजयने अशा एका गोष्टीचा खुलासा केला ज्यामुळे त्याला तामिळडू संघातून वगळण्यात आले होते.
आपण सर्वांनीच मुरली विजयला मैदानावर कित्तेकदा स्टायलिश सेलिब्रेशन करताना पाहीले आहे.
हिच स्टाईल एकदा मुरली विजयच्या वाटेतील अडसर ठरली होती. त्याच्या लांब केसांमुळे त्याला तामिळनाडू संघातून डच्चू देण्यात आला होता.
“मला माझ्या कामगिरीच्या जोरावर आज कोणी रोखू शकत नाही. केसांचा आणि खेळाचा काही संबंध नसला तरी त्यावेळी संघ व्यवस्थापनाने असा निर्णय का घेतला याचे कोडे मला आजही उलगडले नाही.” असे सलामिवीर मुरली विजय म्हणाला.
गेल्या चार वर्षांपासून मुरली विजय भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या फलंदाजीने भारतीय संघाला अनेक वेळा संकाटातून तारले आहे.
ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत मुरली विजयची कामगिरी भारतीय संघासाठी महत्वाची ठरणार आहे.
मुरली विजयने 57 सामन्यांमध्ये 40.07 च्या सरासरीने 3907 धावा केल्या आहेत त्यामध्यें 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात
–त्या व्हिडिओमुळे विराट कोहली-अनुष्का शर्मा अडचणीत