भारतीय फलंदाज सरफराज खानचा भाऊ मुशीर खानने दुलीप ट्रॉफीमधील आपला पदार्पणाचा सामना खास बनवला आहे. भारत ब चे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुशीर खानने भारत अ संघाविरुद्ध 227 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. मुशीरच्या खेळीच्या जोरावर भारत ब संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 79 षटकांत 7 विकेट्स गमावून 202 धावा केल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी आलेल्या भारत ब संघाकडून मुशीर खान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, तेव्हा भारत बची धावसंख्या 33 धावांवर 1 विकेट अशी होती. पण मुशीर खानने भारत अ च्या गोलंदाजांचा एकहाती सामना केला आणि शतक झळकावणारा संघातील एकमेव फलंदाज ठरला.
सरफराज खानचा व्हिडिओ व्हायरल झाला
मुशीर खान हा भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानचा भाऊ आहे. मुशीर खानने शतक पूर्ण करताच सरफराजची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. सरफराज खानने पॅव्हेलियनच्या गॅलरीततून हात वर केले आणि मोठ्याने टाळ्या वाजवून भावाचे शतक साजरे केले. यावेळी सरफराज थोडा भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. शतक झळकावल्यानंतर मुशीर खानही उत्साही मूडमध्ये दिसला आणि त्याने आपल्या भावासोबत हा आनंद उत्तम प्रकारे साजरा केला.
मुशीर खानची ही खेळी खास होती कारण भारत ब संघाने केवळ 94 धावांवर सात विकेट गमावल्या होत्या. येथून मुशीरने नवदीपसोबत आठव्या विकेटसाठी 108 धावांची शतकी भागीदारी केली.
Musheer Khan brings up his 💯 🙌
A special celebration and a special appreciation from brother Sarfaraz Khan 👏#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/92lj578cAs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
दरम्यान मुशीर खानने अशा खेळपट्टीवर शतक केले जेथे इतर फलंदाज एकही धाव काढण्यासाठी धडपडत होते. सरफराज खान (9), रिषभ पंत (7), नितीश कुमार रेड्डी (0), वॉशिंग्टन सुंदर (0) आणि साई किशोर (1) झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले.
मुशीर खान आणि नवदीप सैनी यांनी भारत ब संघाला संकटातून बाहेर काढले आणि दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांना 202/7 च्या सन्मानजनक स्कोअरवर नेले. भारत अ संघाकडून खलील अहमद, आकाशदीप आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी मुशीर खान आपला डाव किती पुढे नेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा –
प्रशिक्षक गंभीरने भारतीय संघाला दिलाय निर्भयपणे क्रिकेट खेळण्याचा ‘गुरुमंत्र’, जयस्वालचा खुलासा
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई