---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 9:00 AM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध १ सप्टेंबर पासून होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेशने १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुशफिकुर रहिम आणि लिटन दास यांचे संघात पुनरागमन झाले आहे. रहिम झिम्बाब्वे दौऱ्यावरुन लवकर घरी परतला होता. मात्र आता तो टी-२० विश्वचषक २०२१ च्या पूर्वीच मैदानात उतरेल.

बांगलादेश हा आठ संघांपैकी एक आहे, जो मेगा इव्हेंटदरम्यान सुपर १२ मध्ये दिसण्यासाठी पात्रता फेरी सामने खेळेल. त्यांचा सामना ओमान, पापुआ, न्यू गिनी आणि स्कॉटलंडशी होईल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्या अनुषंगाने आपल्या तयारीमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. कारण संघाने अलीकडे बरेच टी-२० सामने खेळले आहेत आणि चांगली कामगिरी देखील केली आहे.

परदेशात तीन सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचा सामना केल्यानंतर, त्यांनी ऑस्ट्रेलियात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली होती. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका ४- १ अशी मालिका जिंकली होती. यानंतर बांगलादेश संघ न्यूझीलंडविरुद्धही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशचा टी-२० संघ टी-२० विश्वचषकापूर्वी बऱ्यापैकी स्थिरावलेला दिसत आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला आरामात पराभूत करणाऱ्या संघात बरेच बदल केले नाहीत. रहीम आणि लिटन दास परतल्यानंतरही यष्टीरक्षक नुरुल हसनला त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे कायम ठेवण्यात आले आहे.

गोलंदाजी आक्रमणात विविधता आणण्यासाठी केवळ लेगस्पिनर अमीनुल इस्लामला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत ७ टी-२० सामने खेळले आहेत आणि  १० विकेट्स घेतल्या आहेत.

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका १-१० सप्टेंबरदरम्यान होणार आहे. हे सर्व सामने ढाकाच्या शेर ए बांग्ला स्टेडियमवर होतील. न्यूझीलंडचा संघ २४ ऑगस्ट रोजी बांगलादेशला पोहोचेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी बांगलादेश संघ:
महमुदुल्लाह (कर्णधार), शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, सौम्य सरकार, लिटन दास, मोसाददेक हुसेन, अफीफ हुसैन, मोहम्मद नईम, नूरुल हसन, शमीम हुसेन, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद , मोहम्मद सैफुद्दीन, शोरफुल इस्लाम, तैजुल इस्लाम, मेहदी हसन, अमीनुल इस्लाम, नसुम अहमद.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा उडणार देशांतर्गत क्रिकेटचा धुरळा! ‘या’ दिवशी सुरू होणार नवा हंगाम

स्टायलिश हेयरस्टाईल अन् रंगबिरंगी जॅकेट घालून माही बनला ‘रॉकस्टार’; जाणून घ्या नव्या लूकमागचं गुपित

‘चिन्ना थाला ऑन ड्युटी’! कोविड नियमांमुळे हॉटेलच्या बाल्कनीतच सुरेश रैनाचा वर्कआऊट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---