मे महिन्यात स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलच्या तयारीसाठी मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) संघ आधीच यूएईला रवाना झालेले आहेत. सध्या दोन्ही संघातील सर्व खेळाडू विलीनीकरणाच्या प्रक्रियेतून सामोरे गेल्यानंतर लवकरच सरावासाठी मैदानावर उतरणार आहेत.
त्यामुळे खेळाडूंना मैदानात जाऊन सराव करण्याची अनुमती नाही. अशातच सीएसकेचा दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने त्याच्या हॉटेलच्या एका खोलीतच सरावाला सुरुवात केली आहे. रैना त्याच्या हॉटेलच्या बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारत स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहे.
https://www.instagram.com/reel/CSuEYtwBiMA/?utm_source=ig_web_button_share_sheet
सुरेश रैनाने इंस्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो तंदुरुस्ती बाबतचा सराव करताना दिसून येत आहे. याच्या आधीही रैनाने त्याच्या वेटलिफ्टिंगचा फोटो शेअर केला होता. तसेच सोशल मीडियावर आणखीन एक फोटो शेअर करत त्याने तेथील समुद्रकिनाऱ्याचा आणि हॉटेलच्या स्विमिंग पुलचा फोटो देखील शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CSju5ihoGoU/?utm_source=ig_web_button_share_sheet
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना त्यांच्या परिवाराला सोबत नेण्याची मुभा देखील मिळाली आहे. त्यामुळे रैना त्याची पत्नी प्रियांका आणि मुलीसोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवत आहे. तसेच विलगीकरणादरम्यान त्याच्या परिवारासाठी वेगवेगळे व्यंजन देखील बनवत आहे. त्याने व्यंजन बनवतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CSmkVyXBW6I/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, आयपीएलच्या १४ व्या हंगामात एकूण २९ सामने झाले होते. त्यात रैनाने ७ सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह १२३ धावा केल्या आहेत. अशात सीएसकेला आणखी एकदा जेतेपद मिळवून देण्यासाठी रैना चांगलाच उत्सुक असेल. बीसीसीआयने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काही नियम केले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक संघाला ६ दिवसाच्या कठोर विलीनीकरणाच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
सध्या सीएसकेचा विलगीकरणाचा एक आठवडा पूर्ण झाला आहे. त्यामुळे सीएसकेचा संघ लवकरच त्यांच्या खेळाडूंसह सरावासाठी मैदानात उतरेल. सीएसकेने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले होते. त्यामुळे १० गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–‘हे’ २ शिलेदार विराटला देणार धक्का, युएईतील राहिलेल्या आयपीएल हंगामातून घेऊ शकतात माघार
–तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
–ऐकलंत का! गंभीर म्हणतोय, “भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत, पण अफगानिस्तानपासून आहे धोका”





