---Advertisement---

मुस्तफिजुरनंतर शाकिब अल हसनवरही गाज पडणार? केकेआरच्या निर्णयानंतर एमआयच्या खेळाडूबद्दल चर्चांना उधाण!

On: शनिवार, जानेवारी 3, 2026 8:50 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2026 च्या लिलावात मुस्तफिजुर रहमानला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) आदेशानुसार केकेआरला या बांगलादेशी खेळाडूला संघातून मुक्त (Release) करावे लागले आहे. केकेआरने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, याचा फटका शाकिब अल हसनलाही बसेल का? जो सध्या ‘इंटरनॅशनल लीग टी-20’ (ILT20) मध्ये एमआय (MI) संघाचा भाग आहे.

बांगलादेशमध्ये दोन हिंदू तरुणांच्या हत्येच्या घटनेचा भारतात तीव्र निषेध केला जात आहे, ज्याचा परिणाम आयपीएलवरही झाला. बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला (Mustfijur Rehman) विकत घेतल्याबद्दल अनेकजण केकेआर आणि संघ मालक शाहरुख खान यांच्यावर टीका करत होते. काही लोकांचे म्हणणे होते की, यासाठी बीसीसीआय जबाबदार आहे. वाढता विरोध पाहून अखेर हा निर्णय घेण्यात आला.

कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, बीसीसीआय/आयपीएल नियामकांनी आम्हाला आगामी हंगामापूर्वी मुस्तफिजुर रहमानला तातडीने रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय केकेआरला मुस्तफिजुरच्या जागी दुसरा खेळाडू (Replacement) निवडण्याची परवानगी देईल.

शाकिब अल हसन सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल लीग टी-20’ मध्ये ‘एमआय एमिरेट्स’ संघाकडून खेळत आहे. हा संघ फायनलमध्ये पोहोचला असून 4 जानेवारीला त्यांचा सामना डेझर्ट वायपर्सशी होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्याचा विरोध हा बांगलादेशी खेळाडूंच्या भारतात येऊन खेळण्यावर आणि आयपीएलवर आहे, जी बीसीसीआय आयोजित करते. शाकिब ज्या लीगमध्ये खेळत आहे ती ‘युनायटेड अरब एमिरेट्स’ आयोजित करते, त्यामुळे तिथल्या त्याच्या खेळण्यावर सध्या तरी कोणताही परिणाम होणार नाही.
आयपीएल 2026 च्या लिलावात शाकिब नव्हता.

शाकिब अल हसनने आयपीएल 2026 च्या लिलावासाठी नाव नोंदवले होते, परंतु बीसीसीआयने तयार केलेल्या अंतिम यादीत त्याचे नाव समाविष्ट नव्हते. शाकिबने यापूर्वी 7 सीझन केकेआरसाठी आणि 2 सीझन सनरायझर्स हैदराबादसाठी खेळले आहेत. तो 2021 मध्ये शेवटचा आयपीएल खेळताना दिसला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---