इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्राला 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणूमुळे मागील आयपीएल सत्राचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले होते. परंतु, आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी20 लीग आयपीएल पुन्हा भारतात परतली आहे. सर्व संघांची या हंगामाच्या विजेतेपदासाठी कसून तयारी सुरू आहे. परंतु, यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाला ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुसरा मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा आणि आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. परंतु, आता बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानही काही सामने बाहेर राहणार असल्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स संघ आपल्या यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरूवात पंजाब किंग्ज विरुद्ध 12 एप्रिल रोजी आपला पहिला सामना खेळून करणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्यात बांगलादेशच्या टी20 संघात डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचाही सहभाग असल्यामुळे तो 4 एप्रिलला आपल्या मायदेशी बांगलादेशात परतणार आहे.
त्यानंतर जरी तो दुसर्याच दिवशी भारतात आला, तरी त्याला किमान 7 दिवस तरी क्वारंटाईन रहावे लागणार आहे. मगच तो राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित खेळाडूंमध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे राजस्थानला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा पंजाब किंग्जविरुद्धचा सामना जोफ्रा आर्चर आणि मुस्तफिजुर रहमान यांच्याशिवाय खेळावा लागणार आहे.
रेहमानने साल 2015 मध्ये भारतीय संघाचा केला होता अपमान
सुत्रांनुसार असे सांगितले जात आहे की, राजस्थान रॉयल्सचा 15 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटलशी होणाऱ्या सामन्यातही तो संघाबाहेर राहणार आहे. राजस्थान संघाने रेहमानला 1 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. साल 2016 ला त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर या लीगमधील 24 सामन्यांत त्याने 7.51 च्या इकोनॉमी रेटने 24 विकेट्स घेतल्या आहेत. 16 धावांत तीन गडी बाद, ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरीने आहे.
मुस्तफिजुर रहमान हा तोच गोलंदाज जो भारतीय संघातील अनेक नामांकित खेळाडूंचा अपमान केल्यामुळे चर्चेत आला होता. साल 2015 मध्ये एक जाहिरात आली होती. त्या जाहिरातीमध्ये मुस्तफिजुर रहमान एका कटरचे प्रमोशन करताना दिसला होता आणि खाली धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांची शीर कापलेले दिसत होती.
त्यावेळी बांग्लादेश विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने आपल्या ऑफ कटर गोलंदाजीने भारतीय फलंदाजांचा धुव्वा उडवला होता. त्याचाच संदर्भ घेत ही जाहिरात तयार करण्यात आली होती. पण नंतर या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण ‘हा’ कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच
आयपीएल २०२१ साठी बंगलोरच्या ताफ्यात ‘या’ खास व्यक्तीची झाली नेमणूक
आनंद गगनात मावेना! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉटेल रुमच्या बाहेरच हरभजनचा भांगडा