जगभरातील दिग्गज फलंदाजांना त्याच्या फिरकीनं बाद करणारा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यानं भारतातील फूड इंडस्ट्री उद्योगात गुंतवणूक केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या दिग्गज गोलंदाजानं भारतातील एका मोठ्या फूड इंडस्ट्री आणि कन्फेक्शनरी उत्पादन युनिटमध्ये पैसे गुंतवले आहेत. हा कारखाना कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बदनकुप्पे या भागात आहे.
मुथय्या मुरलीधरनच्या (Muthiah Muralidaran) नवीन बिझनेसचं नाव “मुथय्या बेव्हरेजेस अँड कन्फेक्शनरीज” आहे. कर्नाटकचे आणि उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी ही घोषणा केली. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच अनेकांना रोजगारही मिळेल, असं त्यांनी म्हटले आहे.
सुरुवातीला यामध्ये 230 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना होती, मात्र आता ती वाढवून 1400 कोटी रुपयांची करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 1000 कोटींची गुंतवणूक केली जाईल. यामध्ये 46 एकर जागेवर उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. मंत्री एम. बी. पाटील यांनी असेही सांगितले की, या प्रकल्पासाठी 46 एकर जमीन आधीच दिली गेली आहे आणि जानेवारी 2025 मध्ये उत्पादनाचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. पाटील पुढे म्हणाले की, नजीकच्या काळात धारवाडमध्ये आणखी एक युनिट उभारण्याची मुरलीधरनची योजना आहे.
मुथय्या मुरलीधरननं (Muthiah Muralidaran) त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीमध्ये 133 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 800 विकेट्स त्याच्या नावी केल्या. यादरम्यान त्याची इकाॅनाॅमी 2.47 राहिली आहे. तर कसोटीच्या एका डावात त्यानं 51 धावा देऊन 9 विकेट्स त्याच्या नावी केल्या होत्या. मुरलीधरननं 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 534 विकेट्स त्याच्या नावी केले आहेत. तर त्यानं 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 13 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियात होणार नव्या विकेटकीपरची एंट्री! मयंक यादवला संधी मिळणार का?
नव्याने तयार होत असलेल्या या स्टेडियमकडे मोदींचे जातीने लक्ष; का आहे खास?
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचे नवे फिल्डिंग कोच? गौतम गंभीरशी काय चर्चा झाली?