येत्या 6 (ऑक्टोबर) तारखेला श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी श्रीलंकाचा हा माजी दिग्गज प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे. दुसरीकडे वनडे विश्वचषक 2023 साठी जोरदार वातावरण तयार होताना दिसत आहे. अशात मुरलीधरन याने मोठी भविष्यवाणी केली आहे. माजी दिग्गजाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी संघ निवडले, पण याती श्रीलंकेचे नाव नाहीये.
मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वाधिक 800 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी महत्वाची राहिली आहे. मुरलीधरनच्या मते आगामी वनडे विश्वचषकात यजमान भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचतील. चौथा संघ कोणताही असू शकतो, असे मुरलीधरनला वाटते. आपल्या श्रीलंकन संघाला देखील त्याने उपांत्य सामन्यासाठी दावेदार मानले नाही.
माध्यमांशी बोलताना मुरलीधरन म्हणाला, “मी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांना उपांत्य सामन्यासाठी दावेदार मानतो. चौथा संघ खोणताही असू शकतो. पण या तीन संघांकडे अधिक संधी आहेत. पण तुम्हाला माहीत नाहीये की, क्रिकेटमध्ये कधी काय होईल. या खेळात नशीब महत्वाची भूमिका पार पाडते. आपण मागच्या विश्वचषकातच पाहिले. असे वाटत होते की, न्यूझीलंड जिंकेल. पण इंग्लंडला नशिबाची साथ मिळाली आणि त्यांनी ट्रॉफी जिंकली.”
यावेळी मुरलीधरनला असा प्रश्न विचारला गेला की, जयमान भारताला मायदेशातील परिस्थितीचा घायदा मिळेल? यावर त्याने उत्तर दिले की, “नक्कीच भारताला फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीचा फायदा मिळेल. तसेच त्यांच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळण्याची सवय आहे.” आपल्या सिनेमाविषयी बोलताना मुरलीधरनने स्वष्ट केले की, यामध्ये 20 टक्के क्रिकेट दाखवले गेले आहे आणि राहिलेले 80 टक्के त्याचा जीवनप्रवास आहे. (Muttiah Muralitharan has predicted about World Cup 2023 semi-finals)
महत्वाच्या बातम्या –
विरूष्का पुन्हा होणार आई-बाबा? फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण
चाहत्यांसाठी कॅप्टन होतोय रेडी, पुन्हा दिसणार जुन्या लुकमध्ये, व्हिडिओ होतोय व्हायरल