---Advertisement---

मुरलीधरन-जयवर्धनेचा श्रीलंकन क्रिकेट मंडळावर जोरदार बाऊंसर

On: शनिवार, जून 16, 2018 5:42 PM
---Advertisement---

महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि महान गोलंदाज मुथ्थया मुरलीधरन यांच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन क्रिकेटची परीस्थिती खूपच बिकट झाली आहे.

गेल्या चार वर्षात श्रीलंकन संघाचा डोलारा पूर्णपने कोलमडून गेला आहे.

याच कारणास्तव श्रीलंकन क्रिकेट मंडळाने संघाला सावरण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापून त्यामध्ये महेला जयवर्धने,मुथ्थया मुरलीधरन आणि कुमार संगकारा या माजी खेळाडूंना सहभागी होण्यासाठी गुरूवार दि.14 जून रोजी विनंती केली होती.

पण महेला जयवर्धनेने श्रीलंकन क्रिकेट मंडळाची विनंती धुडकावून लावत ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टिका केली.

“मी क्रीडा मंत्री आणि निवड समितीच्या विनंतीवरून मागे एक वर्ष क्रिकेट समिती आणि सहा महिने सल्लागार समितीमध्ये काम केले आहे. आमच्या समितीच्या कोणत्याही शिफारसी लागू केल्या नाहीत. मला  श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या व्यवस्थेवर विश्वास नाही.” असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केले.

त्याचबरोब शुक्रवार दि.15 जूनला मुथ्थया मुरलीधरननेही ही विनंती फेटाळून लावत श्रीलंकन क्रिकेट मंडळावर टिका केली.

“मी महेलाने केलेल्या वक्तव्याचे पूर्ण समर्थन करतो. श्रीलंकन क्रिकेट मंडळ आमचा वापर करून गेल्या काही दिवसात केलेल्या वाइट गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मला याचे वाइट वाटते की संघावर जेव्हा वाइट वेळ येते तेव्हाच यांना आमची आठवण येते.”  मुरलीधरन श्रीलंकन पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

“जर श्रीलंकन संघाला माझी खरचं गरज आहे असे जाणवले तर मी माझ्या बाकीच्या सर्व जबाबदाऱ्या सोडून संघाच्या मदतीस येइन.” मुरलीधरन पुढे असे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….

अखेर आयपीएलमधील हिशोब शिखर धवनने चुकता केला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment