---Advertisement---

दिग्गज गोलंदाज मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये दाखल; चेन्नईत तातडीने करण्यात आली अँजिओप्लास्टी

On: सोमवार, एप्रिल 19, 2021 2:50 AM
---Advertisement---
भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. हा हंगाम सुरु होऊन अजून एक आठवडाच उलटला नाही तर सनराझर्स हैदराबादला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. हैदराबाद संघांचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंका दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला चेन्नईमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.मुरलीधरन सध्या हैदराबाद संघाबरोबर चेन्नईमध्ये आहे. दरम्यान, त्याला रविवारी (१८ एप्रिल) सकाळी हृदयावरील उपचारांसाठी चेन्नईतील ओपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता असे समजत आले ही त्याची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून त्याच्या धमणीमध्ये एक स्टेंट टाकण्यात आला आहे. तसेच त्याचा जीवाला कोणताही धोका नाही.क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सनरायझर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की मुरलीधरन तपासणीसाठी गेला होता त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तातडीने उपचार करुन घेण्याचा सल्ला दिला.

सनरायझर्स हैदराबाद संघाचे सीइओ शान्मुगनाथन यांनी सांगितले की ‘मुरलीधरनने आयपीएलसाठी येण्यापूर्वी श्रीलंकेमध्ये त्याच्या हृदयात असलेल्या ब्लॉकेजबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्याला आधी सांगण्यात आले होते की स्टेंट टाकण्याची कोणतीही अवश्यकता नाही. पण चेन्नईमधील ओपोलो हॉस्पिटलमध्ये त्याला अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानेही तातडीने उपचार करुन घेतले. तो आता बरा आहे. तसेच लवकरच मैदानात दिसेल.’

मुरलीधरनने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या एक दिवसापूर्वीच शनिवारी (१७ एप्रिल) आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याने कसोटीत एकूण १३३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२.७२ च्या सरासरीने एकूण ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३५० वनडे सामने खेळताना एकूण ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा एक विक्रम आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना रुग्णांवर ७ महिन्याची गर्भवती महिला डॉक्टरला उपचार करताना पाहून सेहवागने केले ‘हे’ आवाहन

आथिया शेट्टीपूर्वी ‘या’ अभिनेत्रींसोबतही जोडले गेले होते केएल राहुलचे नाव

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पोलार्ड नाही तर हार्दिक पंड्या होता सामनावीराचा मानकरी, ‘या’ भारतीय दिग्गजाचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---