भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कारकिर्दीतील ८१ धावांची खेळी ही सर्वात प्रिय असल्याचे वक्तव्य केलं आहे.
क्रिकइंफो वेबसाईटवरील एका २५ प्रश्नांच्या (रॅपिड फायर) कार्यक्रमात त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले आहे.
तुला अॅडलेडमधील २३३, कोलकातामधील १८० आणि जमैकामधील ८१ यातील कोणती खेळी सर्वात जास्त आवडते असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
“या तीन पैकी एक खेळी निवडणे प्रचंड कठीण काम आहे. परंतु तरीही एक सांगायचं असेल मी जमैकामधील ८१ धावांची खेळी निवडले. ” असे यावेळी द्रविड म्हणाला.
का आहे ही खेळी महत्त्वाची-
भारतीय संघ जूलै २००६मध्ये विंडीज विरुद्ध चौथा कसोटी सामना ४९ धावांनी जिंकला आहे. यात पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने २०० धावा केल्या होत्या. यातील ८१ धावा एकट्या द्रविडच्या होत्या. ३४० मिनीटे फलंदाजी करताना त्याने चक्क २१५ चेंडूंचा सामना केला होता. याच सामन्यात दुसऱ्या डावात त्याने भारताच्या १७१ धावांपैकी ६८ धावा केल्या होत्या. त्याच्या याच खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता तसेच तो मालिकावीरही ठरला होता.
राहुल द्रविड भारताकडून १६४ कसोटी, ३४४ वनडे आणि १ टी२० सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी कर्णधार सौरव गांगुलीची आर अश्विनसाठी बॅटिंग
-माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड