भारतीय संघाचे दिवंगत कर्णधार मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर पतौडी यांना भारतीय क्रिकेटमध्ये एक मानाचे स्थान आहे. आपले वडील इफ्तिखार अली खान पतौडी यांच्यापासून मिळालेला क्रिकेटचा वारसा त्यांनी पुढे समर्थपणे नेला. त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र, या विवाहानंतर टायगर यांच्या खराब कामगिरीसाठी मला जबाबदार धरण्यात येत होते, असा खुलासा स्वत: शर्मिला टागोर यांनी नुकताच केला आहे.
शर्मिला यांनी केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार टायगर पतौडी व सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी १९६८ मध्ये विवाह केला होता. त्यानंतर, अनेकदा शर्मिला यांना प्रेक्षकांमध्ये बसून भारतीय संघाला प्रोत्साहन देताना पाहायला जायचे.
त्याविषयीचा एक खुलासा करताना शर्मिला यांनी एका खासगी कार्यक्रमात म्हटले, “आत्ता ज्याप्रकारे विराट कोहलीच्या खराब कामगिरीसाठी त्याची पत्नी अनुष्का शर्माला काहीजण जबाबदार धरतात, असाच प्रकार माझ्या सोबतही होत असत. टायगर यांनी खराब कामगिरी केल्यास मलादेखील नावे ठेवण्यात येत. इतकेच काय स्वतः माझे वडिल देखील टायगर यांनी एका सामन्यात झेल सोडल्यानंतर माझ्यावर रागावले होते.”
टायगर व शर्मिला यांची दोन्ही मुले सैफ अली खान व सोहा अली खान हे अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत.
भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार होते टायगर
भारतीय क्रिकेट संघासाठी टायगर यांनी १९६१ मध्ये पदार्पण केले होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना कर्णधारपदी संधी देण्यात आलेली. त्यांनी भारतीय संघासाठी ४६ कसोटी सामने खेळले. २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. पतौडी कुटुंबाच्या सन्मानार्थ भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेला ‘पतौडी ट्रॉफी’ म्हणून नाव दिले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी
याला म्हणतात प्रतिभा! दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीने जिंकली सर्वांची मने, पाहा व्हिडिओ
जडेजा ऑन फायर!! केएल राहुलला ‘रॉकट थ्रो’ करत केले धावबाद,पहा व्हिडिओ






