---Advertisement---

‘तुम्ही सतत दाखवा…, भांडण फक्त मैदानावर’, विराटविषयी गंभीरचे मन जिंकणारे विधान; Video पाहून चाहतेही फिदा

On: शनिवार, डिसेंबर 23, 2023 1:45 PM
Virat-Kohli-And-Gautam-Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर नेहमीच त्याच्या परखड मतांमुळे आणि मैदानातील आक्रमकतेमुळे चर्चेचा विषय ठरतो. एवढंच नाही, तर आयपीएलमध्येही अनेकदा गौतम गंभीर विराट कोहली याच्याशी भिडतानाही दिसला आहे. आयपीएल 2023मधील एका सामन्यात दोघे एकमेकांशी भिडताना दिसले होते. मैदानावर दोघांमध्ये नेहमीच बाचाबाची होताना दिसते, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी गंभीरचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

गंभीरचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत गौतम गंभीर (Gautam Gambhir Video) म्हणताना दिसत आहे की, “भांडण फक्त मैदानावर आहे.” खरं तर, या व्हिडिओत गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्याविषयी भाष्य करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, अँकर त्याला विचारतो, “विराटने वनडेत त्याचे जे 50वे शतक केले होते, ते कोणत्या गोलंदाजाविरुद्ध पूर्ण केले होते?” या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणतो की, “लॉकी फर्ग्यूसन.” यावेळी गंभीर हेदेखील म्हणतो की, “हे तुम्ही वारंवार दाखवा की, मला सर्वकाही लक्षात राहते. माझे भांडण फक्त मैदानावर आहे.”

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात विराटचे शतकांचे अर्धशतक
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाचा सामना उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. या सामन्यात विराट कोहली याने शानदार शतक झळकावले होते. यावेळी विराटने 113 चेंडूंचा सामना करताना 117 धावांची शतकी खेळी केली होती यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 50वे शतक होते.

विराटच्या शतकांचा आकडा
विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची कामगिरी पाहायची झाली, तर त्याने कारकीर्दीत 111 कसोटी सामने, 292 वनडे आणि 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या बॅटमधून 8676 धावा करताना 29 शतके निघाली आहेत. तसेच, वनडेत 13848 धावा करताना 50 शतके निघाली आहेत, तर टी20त 4008 धावा करताना 1 शतक निघाले आहे. अशाप्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 80 शतके पूर्ण केली आहेत. तो सचिन तेंडुलकर याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणारा दुसरा फलंदाज आहे. (my fight is only on the field gautam gambhir s heart melting statement about cricketer virat kohli see video here)

हेही वाचा-
हे प्रभू…! चेंडू मारला अन् बिनधास्त क्रीझच्या बाहेर आली मूनी, भारतीय खेळाडूने पुढं काय केलं एकदा पाहाच
अर्रर्र! भारतीय संघाला एक नाही, तर दोन धक्के; महत्त्वाच्या मालिकेला मुकणार स्टार खेळाडू; वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---