क्रिकेटविश्वात सध्या केएल राहुल त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. विशेष म्हणजे राहुल या नावाला भारतात मोठे वलय आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडमुळे हे नाव क्रिकेटविश्वास प्रसिद्ध झाले, तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे अनेक चित्रपटांमध्ये राहुल हे नाव आहे. त्यातच आता केएल राहुल त्याचे नाव क्रिकेटमध्ये गाजवत आहे. अनेकांच्या मते त्याचे नाव राहुल द्रविडच्या नावावरून ठेवण्यात आले होते. पण, त्याच्या नावामागे एक खास किस्सा आहे, ज्याचा उलगडा खुद्द केएल राहुलनेच केला आहे.
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात केएल राहुलने गौरव कपूरशी बोलताना सांगितले की, त्याच्या आईने नावामागे सांगितलेली कथा खरी नव्हती. तो म्हणाला, ‘तिने (केएल राहुलच्या आईने) मला सांगितले होते की, ती शाहरुख खानची मोठी चाहती होती आणि ९० च्या दशकात त्याच्या बहुतेक भूमिकांचे नाव राहुल होते. त्यामुळे मी माझ्या नावाची हीच गोष्ट सांगायचो. मी माझ्या एका मित्रालाही ही गोष्ट सांगितली होती, तो खूप बॉलिवूड चित्रपट पाहायचा. त्यामुळे तो म्हणाला, भावा, शाहरुख खानच्या राहुल नावाची पहिली भूमिका १९९४ साली आली होती. आणि तू १९९२ साली जन्मला आहे. त्यामुळे हे कसं शक्य आहे.’
यानंतर केएल राहुलने गुगलवर देखील याबद्दल माहिती शोधली आणि त्याच्या लक्षात आले की, त्याच्या आईने त्याला खोटी गोष्ट सांगितली. याबद्दल त्याने त्याच्या आईलाही विचारले. त्यावेळी त्याची आई त्याला म्हणाली, ‘तसंच काहीतरी होतं… पण आता त्याचं काय करायचं आहे.’
असे असले तरी केएल राहुलच्या नावाची दुसरी गोष्ट जी त्याच्या वडीलांनी सांगितली होती, ती अशी की, त्यांनी सुनील गावसकर यांच्या मुलाचे नाव रोहन ऐवजी चुकून राहुल असे ऐकले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला राहुल नाव दिले.
केएल राहुलने गौरव कपूरशी बोलताना असाही खुलासा केला की, त्याचे पालक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा त्याला आरबीआयमध्ये नोकरी लागली म्हणून खूश होते. तो म्हणाला, ‘त्यांच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस तो होता, जेव्हा मला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) नोकरी लागली. मला सरकारी नोकरी लागल्याने, ते आनंदी होते. तेव्हा मी चार वर्षे भारतीय संघासाठी खेळलो देखील होतो, पण त्यामुळे त्यांना आनंद नव्हता. त्यांच्यामते नोकरी लागल्यानंतर मी स्थिर झालो.’ (My mom lied to me for first 26-27 years of my life: KL Rahul)
केएल राहुने हे देखील सांगितले की, लॉकडाऊनमध्ये त्याच्या आईने त्याला त्याची पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यास देखील सांगितले होते. केएल राहुल सध्या आयपीएल २०२२ मध्ये खेळत असून लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘अजेय’ ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये बिघडणार गणित? स्टार अष्टपैलू महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर
डिविलियर्सचा ‘तो’ व्हॉईस मॅसेज ऐकून कोहली झाला होता भावूक, सांगितला इमोशनल किस्सा
पाकला पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ पठ्ठ्याने अक्षरशः रडवलं; धुवांधार फटकेबाजी करत ठोकलंय शतक