---Advertisement---

‘मी संघात माझे नाव…’, इंग्लंड कसोटी संघाच्या घोषणेनंतर स्टुअर्ट ब्रॉडची लक्षवेधी प्रतिक्रिया

Stuart Broad
---Advertisement---

भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत संघाचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, जेव्हा इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा तो पाच सेकंद त्यात आपले नाव शोधत राहिला आणि मग त्याला समजले की, आपण निवृत्ती घेतली आहे.

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने यावर्षी जुलैमध्ये निवृत्ती घेतली आहे. 2007 मध्ये पदार्पण करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या 17 वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 167 कसोटी सामने, 121 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 56 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि या कालावधीत त्याने एकूण 847 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी येईल तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडच्या निवृत्तीनंतरची ही संघाची पहिली मालिका असेल.

भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर झाला असून स्टुअर्ट ब्रॉडच्या म्हणण्यानुसार तो या संघात आपले नाव शोधत होता. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर इंग्लंडच्या कसोटी संघात निवडलेल्या खेळाडूंची यादी शेअर केली आणि पाच सेकंदांसाठी संघात आपले नावही शोधत असल्याचे सांगितले.

स्टुअर्ट ब्रॉड ने इंग्लैंड टीम को लेकर दी प्रतिक्रिया

स्टुअर्ट ब्रॉडने 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. जेम्स अँडरसन (James Anderson) याच्यासोबत स्टुअर्ट ब्रॉडची जोडी अनेक वर्षे खूप ताकदवान ठरली. या दोघांनी मिळून इंग्लंड संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. मात्र, आता इंग्लंडचा संघ प्रथमच स्टुअर्ट ब्रॉडशिवाय मैदानात उतरणार आहे. (My name in the team Stuart Broad’s eye-catching reaction after the England Test squad was announced)

महत्वाच्या बातम्या

आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतबद्दल दिग्गजाची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बर्‍याच गोष्टी चुकीच्या…’
‘जितेश शर्मा सूर्यकुमार सारखा…’, इरफान पठाणचं यष्टिरक्षक फलंदाजाबद्दल धक्कादायक विधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---