भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेत यजमान संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. या मालिकेत ईशान किशनही संघाचा एक भाग आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याने एका मजेदार खेळात भाग घेतला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मंगळवारी (२८ नोव्हेंबर) बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला एक आव्हान दिले गेले आहे, ज्यामध्ये त्याला खेळादरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे चुकीचे उत्तर द्यायचे होते.
सुरुवातीला त्याला पहिल्यांदा विचारण्यात आले की, तुझे नाव काय आहे? उत्तरात तो म्हणाला, व्हीव्हीएस लक्ष्मण, यानंतर त्याचे वय विचारले असता, उत्तरात तो ८२ वर्षे सांगतो. अशाप्रकारे एकामागून एक असे एकूण 12 प्रश्न विचारले जातात आणि त्या सर्वांची चुकीची उत्तरे देण्यात ईशान यशस्वी होतो. अशा प्रकारे इशान खेळ जिंकतो.
Wrong answers only with @ishankishan51 😎
When wrong is right here 😉
WATCH 🎥🔽 – By @28anand | #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/P9pw3X7azQ
— BCCI (@BCCI) November 28, 2023
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये इशान किशनचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला होता. त्याने पहिल्या सामन्यात 58 तर दुसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या. मात्र, गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
तिसऱ्या टी20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 3 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. भारताकडून ऋतुराज गायकवाड याने 57 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव (३९) आणि तिलक वर्मा (३१*) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले.ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त शतक झळकावले. (My name is VVS Laxman see why Ishaan Kishan said)
महत्वाच्या बातम्या
मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली