भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक याने नुकताच 2012 सालच्या एका घटनेचा उलगडा केला आहे. प्रेक्षकांनद्वारा एका सामन्यादरम्यान होत असलेल्या ट्रोलिंगमुळे त्याच्या पत्नीला मैदानसोडून जावे लागले असल्याचा खुलासा त्याने केला आहे.
ही घटना 2012 सालची आहे. कार्तिक त्यावर्षी इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळत होता. एका यूट्यूब वाहिनीवरील संभाषणादरम्यान कार्तिक म्हणाला, “माझी पत्नी मैदान सोडून गेली. हे एकप्रकारे प्रेक्षकांकडून होणार असलेल्या धोक्यामुळे होते. ते जवळजवळ ड्रेसिंग रूममध्येच शिरले होते. ”
कार्तिक म्हणाला,” मी फलंदाजाला तीन वेळा मंकडींगसाठी इशारा दिला होता. तरी देखील तो याकडे दुर्लक्ष करत होता. उलट त्याने नंतर गोलंदाजालाच दोष देणे सुरू केले. जर चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज रेषेतून बाहेर येत असेल तर सर्व 11 फलंदाजांना मी असे(मंकडींग) करण्यास तयार आहे.”
मुरली कार्तिक म्हणाला, “मी यापूर्वी पाच वेळा मंकडींग केली होती. पण तेव्हा मी हे सोमरसेटच्या विरोधात केले होते व त्यामुळे ते वादग्रस्त ठरले. मी सोमरसेटसाठी तीन वर्षे खेळलो होतो. मात्र नंतर मी सरेकडून खेळत असल्यामुळे सोमरसेट मॅनेजमेन्ट आधीच नाराज होते. त्यांनी माझ्यावर बरेच आरोप केले. माझ्या पत्नीला शहरातील जीवन आवडते, म्हणून मी लंडनला गेलो, असा आरोप त्यांनी केला होता.”
कार्तिक पुढे म्हणाला, “बहुधा त्यावेळी श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यामध्ये मालिका सुरु होती. त्यावेळी, मायकेल होल्डिंग व नासिर हुसेन यांनीही माझे कृत्य बरोबर असल्याचे बोलले होते. त्यावेळी म्हटले गेले की गोलंदाजाने जे काही केले ते अनवधानाने केले गेले. पण समजा आपण रात्री कार चालवत आहात व आपण सिग्नल पाहिले आणि आजूबाजूला कोणी नव्हते. तर आपण तेथे कोणीही उभे नाही म्हणून सिग्नल पार करणार का? याला खिलाडूवृत्ती म्हणतात का?’
दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कार्तिकने 2019 आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला केलेल्या मंकडींगचे देखील समर्थन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे
ख्रिस गेलच्या अतरंगी फोटोवर डेव्हिड वॉर्नरने घेतली फिरकी; केली ‘अशी’ विनोदी कमेंट