देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी देशभरातील काही शहरांमध्ये खेळली जात आहे. सोमवारी (21 नोव्हेंबर) या स्पर्धेत एक ऐतिहासिक सामना खेळला गेला. तमिळनाडू विरुद्ध अरुणाचल प्रदेश अशा झालेल्या सामन्यात तमिळनाडू संघाने लिस्ट ए क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढले. या सामन्यात तमिळनाडूचा अनुभवी फलंदाज नारायन जगदीसन याने 277 धावांची वैयक्तिक खेळी केली. तसेच, यादरम्यान त्याने दुसरा सलामीवीर साई सुदर्शन याच्यासह सलामी भागीदारीचा एक नवा विश्वविक्रम ही बनवला.
बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात तमिळनाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना लिस्ट ए क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढले. संघाने निर्धारित 50 षटकात 506 धावा करत विश्वविक्रम बनवला. या संपूर्ण स्पर्धेत याआधीच सलग चार शतके झळकावलेल्या जगदीसनने या सामन्यात एक पाऊल पुढे जात 141 चेंडूत 277 धावांची विश्वविक्रमी खेळी केली. त्याने सलामीवीर साई सुदर्शन (154) याच्यासह पहिल्या गड्यासाठी 416 धावा जोडल्या. हा लिस्ट ए क्रिकेटमधील कोणत्याही गड्यासाठी केलेला सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे.
यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचे दिग्गज ख्रिस गेल व मार्लन सॅम्युएल्स यांच्या नावे होता. त्यांनी 2015 वनडे विश्वचषकात झिम्बाब्वेविरूद्ध दुसऱ्या गड्यासाठी 372 धावा केलेल्या. केवळ सलामीचाच विचार केला तर कॅमेरून डेलपोर्ट व मॉर्नी वॅन विक यांनी दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत क्रिकेट खेळताना 367 धावा केल्या होत्या.
फलंदाजीत विक्रमांची रास लावल्यानंतर तमिळनाडूने गोलंदाजीतही तसाच कारनामा केला. फिरकीपटू एम सिद्धार्थ यांनी मिळवलेल्या पाच बळीमुळे अरुणाचल प्रदेश संघाचा डाव केवळ 71 धावांवर आटोपला. त्यामुळे तमिळनाडू संघाने तब्बल 435 धावांनी अरुणाचल प्रदेशचा पराभव केला. हा देखील एक विश्वविक्रम ठरला गेला आहे.
(N Jagdeesan And Sai Sudarshan Score World Record 416 Runs Partnership In List A)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच
रोहित शर्माच्या 264 धावांही कमी पडल्या, जेव्हा नारायण जगदीसनने केली ‘एवढ्या’ धावांची विक्रमी खेळी