इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली. विजय हजारे ट्रॉफी गाजवणारा तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसन याला यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर त्याने आपल्या कारकिर्दीत एमएस धोनी याचे किती योगदान आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली.
एन जगदीसन हा देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज मानला जातो. मागील तीन वर्षापासून तो आपल्या राज्यातीलच फ्रॅंचायजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता. मात्र, संघात एमएस धोनीचा समावेश असल्याने त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. आयपीएल 2023 साठी चेन्नईने त्याला आपल्या संघात कायम केले नाही. लिलावात त्याच्यावर कोलकाता नाईट रायडर्सने 90 लाखांची सर्वाधिक बोली लावली. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाल्याचे बोलले जाते.
या संपूर्ण प्रकारानंतर त्याने आपल्या कारकिर्दीत धोनी याचे मोठे योगदान असल्याचे म्हटले. जगदीसन म्हणाला,
“ज्यावेळी मी चेन्नई संघाचा भाग होतो त्यावेळी मला दोन्ही नेहमी मार्गदर्शन करायचा. जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे मदतीसाठी गेलो तेव्हा तेव्हा त्याने मला आवश्यक ती मदत केली. जेव्हा मला काही प्रश्न असायचे तेव्हा तो नेहमीच पर्याय देण्यासाठी तत्पर होता.”
विजय हजारे ट्रॉफी 2022 या वनडे स्पर्धेत जगदीसन याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. या स्पर्धेत त्याने आठ सामने खेळताना तब्बल 138 च्या सरासरीने 830 धावा कुटल्या. यामध्ये सलग पाच शतकांचा समावेश होता. हा विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील विक्रम आहे. यामध्ये त्याने 277 धावांची एक विश्वविक्रमी खेळी देखील केली होती.
(N Jagdeesan Said MS Dhoni Always Helps Me In CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद
डीन एल्गरला सांताकडून ‘गिफ्ट’! चेंडू स्टम्पला लागूनसुद्धा राहिला नाबाद, व्हिडिओ व्हायरल