चेन्नई। विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीकडे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवण्यासाठी काहीच उरले नव्हते. त्याच्या निवृत्तीमुळे एका युगाचा शेवट झाला आहे, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी मंगळवारी (१८ ऑगस्ट) म्हटले आहे. धोनी क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
‘धोनीला मिळविण्यासाठी काय राहिले होते?’
श्रीनिवासन यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, “जेव्हा धोनी म्हणतो की तो निवृत्ती घेत आहे, तेव्हा हे एक पर्व संपण्यासारखे आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली वनडे विश्वचषक जिंकला आहे. याव्यतिरिक्त चॅम्पियन्स ट्रॉफीवरही भारताचे नाव कोरले आहे. तो एक उत्कृष्ट कर्णधार, शानदार यष्टीरक्षक, एक आक्रमक फलंदाज राहिला आहे. तो एक असा खेळाडू आहे, ज्याने संपूर्ण संघाला प्रेरित केले.”
“धोनीकडे मिळविण्यासाठी काय राहिले होते? प्रत्येक क्रीडाप्रेमीला माहिती आहे की, तो कोणत्यावेळी निवृत्तीची घोषणा करेल. मला दु:ख आहे की तो पुन्हा भारतीय संघासाठी मैदानावर उतरणार नाही. परंतु याचा आनंदही आहे की तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणे सुरू ठेवणार आहे,” असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले की, “तो क्रिकेटच्या मैदानात दिसेल. सीएसके आता जागतिक ब्रँड आहे. लोक याबद्दल खुश असतील की ते धोनीची कौशल्ये मैदानावर पाहू शकतील.” श्रीनिवासन ‘इंडिया सिमेंट्स’चे प्रमुख आहेत. त्यांना जेव्हा विचारण्यात आले की, धोनी केव्हापर्यंत खेळेल?, तेव्हा ते म्हणाले की, “मला असे वाटते की तो नेहमी खेळत राहावा.”
महत्त्वाच्या बातम्या-
-‘कोण माझी पहिली कार मला परत आणून देईल का?’ मास्टर ब्लास्टर करतोय विनवणी
-२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?
-सीपीएलच्या पहिल्याच सामन्यात सुनील नारायणचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला संघाला विजय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या फायनलमध्ये ‘या’ धडाकेबाज खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार; धोनी आहे ‘या’ क्रमांकावर
-धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
-‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा