पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतमुलांच्या गटात दुसऱ्या पात्रता फेरीत युगंधर शास्त्री, तक्षिल नागर, तनिश पाटील आणि पृथ्वीराज दुधाने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या पात्रता फेरीत तनिश पाटील व तक्षिल नागर यांनी अर्णव पांडे व आर्यन बॅनर्जी यांचा 9-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. युगंधर शास्त्री याने लेश्या नायडूला 9-0 असे सहज पराभूत केले. पृथ्वीराज दुधानेने इंद्रनील जोशीवर 9-1 असा विजय मिळवला.
निकाल: दुसरी पात्रता फेरी: 12 वर्षांखालील मुले:
युगंधर शास्त्री वि.वि.लेश्या नायडू 9-0;
तनिश पाटील वि.वि.अर्णव पांडे 9-2;
तक्षिल नागर वि.वि.आर्यन बॅनर्जी 9-2;
पृथ्वीराज दुधाने वि.वि.इंद्रनील जोशी 9-1;
विहान कंगतानी वि.वि.अवधूत निलाखे 9-7.
महत्त्वाच्या बातम्या –
डॉ. शर्वरी इनामदार यांना राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण