---Advertisement---

‘लाल मातीचा बादशहा’ राफेल नदालने जिंकले १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

On: रविवार, जून 9, 2019 11:45 PM
---Advertisement---

पॅरिस। रविवारी(9 जून) फ्रेंच ओपन 2019 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदानने चौथ्या मानांकित डॉमनिक थिमचा पराभव करत 18 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे. तसेच नदालचे हे 12 वे फ्रेंच ओपनचे विजेतेपद आहे.

3 तास 1 मिनिट चाललेल्या या अंतिम लढतीत नदालने 6-3, 5-7,6-1,6-1 असा चार सेटमध्ये थीमचा पराभव करत हे विक्रमी विजेतेपद मिळवले.

या लढतीत चॅम्पियन पॉइंट्स मिळवल्यानंतर नदालला त्याचे आनंदअश्रू अनावर झाले होते. विजेतेपद मिळवल्यानंतर भावनिक झालेला नदाल म्हणाला, ‘हे खरंच शानदार आहे, मला ते समजावता येत नाही.’

थीमने या सामन्यात नदालला पहिल्या दोन सेटमध्ये चांगली लढत दिली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये 3-3 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले होते. पण त्यानंतर त्याला पहिल्या सेटमध्ये एकच गेम जिंकता आला. तर नदानने हा सेट 6-4 असा सहज जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये थीमने चांगले पुनरागमन करताना नदालला कडवी झूंज दिली. या सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी असताना थीमने या सेटमध्ये चांगले ग्राउंडस्ट्रोक खेळत पुढील दोन गेम जिंकून सेट आपल्या नावे केला आणि सामन्यात बरोबरी साधली.

त्यानंतर मात्र नदालने थीमवर पूर्णपणे वर्चस्व ठेवले. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये थीमला वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्याने तिसरा आणि चौथा सेट अनुक्रमे 6-1 ,6-1 असा सहज जिंकला आणि विजेतेपदावर नावही कोरले.

या विजेतेपदामुळे तो रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या आणखी जवळ आला आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नदाल असून आता त्यांची ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या 18 झाली आहे.

विशेष म्हणजे मागीलवर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये अंतिम सामन्यात थीम आणि नदालच आमने सामने आले होते. त्यावेळीही नदालनेच बाजी मारली होती. नदालने आत्तापर्यंत 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, आणि 2019 या 12 वर्षी फ्रेंच ओपनची विजेतीपदे मिळवली आहेत.

फ्रेंच ओपन 2019 च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याआधी उपांत्य फेरीत नदालने तिसऱ्या मानांकित रॉजर फेडररचा तर थीमने अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचचा पराभव केला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

फ्रेंच ओपन २०१९: ऍश्ले बार्टीला विजेतेपद; ऑस्ट्रेलियाची ४६ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात

टॉप ५: शिखर धवनने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment