पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या सेड्रिक-मार्सेल स्टीबने गतवर्षीच्या उपविजेत्यै क्रोएशियाच्या इवो कार्लोविचचा 6-3, 6-4 असा पराभव केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 2 तास 20 मिनिट चाललेल्या सामन्यात वाईल्ड कार्ड प्राप्त जागतिक क्रमांक125 असलेल्या 22 वर्षीय भारताच्या सुनित नागलाचा जागतिक क्रमांक 191 असलेल्या 33 वर्षीय सर्बियाच्या विक्टर ट्रॉकी याने 6-2, 6-7(4), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सेटमध्ये विक्टरने पहिल्या गेममध्ये सुमितची सर्व्हिस ब्रेक करत सुमितवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहाव्या गेमपर्यंत विक्टरने 4-2अशी आघाडी घेतली. सातव्या गेममध्य़े विक्टरने नागलची सर्व्हिस ब्रेक केली व आठव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत विक्टरने 6-2 अशी भक्कम आघाडी घेत पहिला संट जिंकला. दुस-या सेटमध्ये चौथ्या गेमअंती 2-2 अशी बरोबरी होती. पाचव्या गेममध्ये विक्टरने नागलची सर्व्हिस ब्रेक करत 3-2 अशी आघाडी घेतली. पुढच्या सहाव्या गेममध्ये नागलने विक्टरची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात 3-3अशी बरोबरी साधली. बाराव्या गेमपर्यंत 6-6 असा सामना बरोबरीत झाला.
सामना टायब्रेकमध्ये असताना सुमितने टायब्रेक जिंकत दुसरा सेट 6-7(4) असा जिंकला. तिस-या सेटमध्ये सुमितची सामन्यावरची पकड सुटली व विक्टरने 6-1 असा सहज सेट जिंकत 6-2, 6-7(4), 6-1 असा सामना जिंकत दुस-या फेरीत प्रवेश केला.
1 तास 5 मिनिट चालेल्या सामन्यात जर्मनीच्या सेड्रिक-मार्सेल स्टीब याने गेल्या वर्षीच्या उपविजेत्या जागतीक क्रमांक 121 क्रोएशियाच्या 40 वर्षीय इवो कार्लोविच याचा 6-3, 6-4 असा पराभव करून दुस-या फेरीत प्रवेश केला. जागतीक क्रमांक 149 असलेल्या 29 वर्षिय सेड्रिकने सामन्याच्या सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या सेटच्या पाचव्या गेमअंती 3-2 अशी आघाडी घेतली . सहाव्या गेममध्ये सेड्रिकने इव्होची सर्व्हिस ब्रेक करत 4-2 अशी आघाडी घेत इव्होवर दबाव निर्माण केला.
पहिल्या सेटच्या नवव्या गेमपर्यंत सेड्रिकने सामन्यावरती आपली पकड पक्की ठेवत पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुस-या सेटमध्ये चौथ्या गेमअंती सामना 2-2 अशा बरोबरीत असताना सेड्रिकने पाचव्या गेममध्ये इव्होची सर्व्हिस ब्रेक करत 3-2 अशी आघाडी घेतली. सहाव्या, आठव्या व दहाव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत सेड्रिकने दुसरा सेट 6-4 असा जिंकला व सामना 6-3, 6-4 असा जिंकत दुस-या फेरीत प्रवेश केला.
2013 ते 2016 दरम्यान दुखापतीमुळे स्पर्धांपासून दुर असलेला सेड्रिक म्हणाला “निरोगी राहणे आणि कोणत्याही मोठ्या दुखापतीपासून स्वत: ला दूर ठेवणे ही माझी प्रथम क्रमांकाची प्राथमिकता असेल. मी थोडी हळू सुरुवात केली. मला माहित आहे की मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.जेणेकरून मी स्पर्धेत आगेकुच करता येईल.
दुस-या सामन्यात जपानच्या पाचव्या मानांकीत यूची सुगीताने इटलीच्या थॉमस फॅबियानोचा 6-3, 6-0 असा एकतर्फी लढतीत पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. 1 तास 13 मिनिट चाललेल्या सामन्यात जागतीक क्रमांक 86 असलेल्या 31 वर्षीय यूची सुगीताने पहिल्या सेटच्या पहिल्या गेमपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखली व दुस-या गेममध्ये थॉमसची सर्व्हिस ब्रेक करत 2-0 अशी आघाडी घेतली.
तिस-या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत पुन्हा चौथ्या गेममध्ये थॉमसची सर्व्हिस ब्रेक करत 4-0 अशी आघाडी घेत थॉमसवर दबाव निर्माण केला. पाचव्या गेममध्ये थॉमसने यूची ची सर्व्हिस ब्रेक केली व सामना 4-1 झाला. पुढे सातव्या व नवव्या गेममध्ये यूची सुगीताने आपली सर्व्हिस राखत 6-3 असा सेट जिंकत सामन्यात आघाडी घातली. दुस-या सेटमध्ये यूची सुगीताने थॉमसच्या सर्व तीन सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-0 असा सहज जिंकला व सामना 6-3, 6-0 असा जिंकून स्पर्धेत आगेकुच केली.
दुहेरी गटत पहिली फेरीत इटलीच्या स्टीफानो ट्रॅवाग्लिया व पाओलो लोरेन्झी या जोडीने रशियाच्या इव्हगेनी डॉन्स्कोय व लिथुआनियाच्या रिकार्डस बेरनकीस यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भारताच्या प्रीमियर एटीपी 250 स्पर्धेत दुसर्या दिवसाचा दुहेरीच्या पहिल्या फेरीत सामना दिग्गज टेनिसपटू दुहेरीतील आठवेळा ग्रॉन्ड स्लॅम विजेता लिअँडर पेस व सहकारी ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन याच्या साथीत खेळणार आहे. त्यांचा सामना भारताच्या दिविज शरण आणि न्यूझीलंडच्या आर्टेम सितक यांच्याशी होणार आहे.
एकेरी गट- पहिली फेरी
सेड्रिक-मार्सेल स्टीब (जर्मनी) वि वि इवो कार्लोविच (क्रोएशिया) 6-3, 6-4
यूची सुगीता (जपान)(5) वि वि थॉमस फॅबियानो (इटली) 6-3, 6-०
विक्टर ट्रॉकी (सर्बिया) वि.वि सुमित नागल (भारत) 6-2, 6-7(4), 6-1
दुहेरी गट- पहिली फेरी
स्टीफानो ट्रॅवाग्लिया (इटली) / पाओलो लोरेन्झी (इटली) वि वि इव्हगेनी डॉन्स्कोय (रशिया) / रिकार्डस बेरनकीस (लिथुआनिया) 6-3, 6-4