क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अविश्वसनीय घटना पाहायला मिळतात. कधीकधी एखादा संघ डोंगराएवढी धावसंख्या बनवून विश्वविक्रम करतो. तर, कधीकधी असे घडते की, एखाद्या संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. असेच काहीसे महिलांच्या वरिष्ठ वनडे ट्रॉफीमध्ये घडले. या सामन्यात मुंबईने नागालँडला १० गडी राखून पराभूत केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हा विजय अवघ्या ४ चेंडूत मिळविला.
नागालँडची कचखाऊ फलंदाज
इंदोरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नागालँडने प्रथम फलंदाजी करताना केवळ १७ धावा केल्या. मुंबईच्या बलाढ्य संघाने हे लक्ष्य अवघ्या ४ चेंडूत गाठले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या वनडे सामन्यात नागालँडचा संघ १७.४ षटकांत आटोपला.
नागालँड संघाची कोणतीही फलंदाज दहाच्या आकड्याना स्पर्श करु शकली नाही. ६ खेळाडू शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. नागालँडसाठी सरीबाने सर्वाधिक ९ धावा केल्या. यानंतर दुसर्या सर्वोच्च धावा अतिरिक्त धावांच्या रुपाने आल्या. नागालँडला वाइडच्या ३ अतिरिक्त धावा मिळाल्या.
मुंबईचा चार चेंडूत विजय
मुंबईच्या सलामीवीरांनी फक्त ४ चेंडूत १८ धावा केल्या. ईशा ओझाने ४ चेंडूत १३ धावा केल्या. तर, वृषाली भगतने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. एक चेंडू नो बॉल होता, त्यानंतर मुंबईने केवळ ४ चेंडूत सामना जिंकला. या स्पर्धेतील नागालँडचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी मध्य प्रदेशविरुद्धही नागालँडची टीम अवघ्या २७ धावांवर बाद झाली होती. तर, पंजाबविरुद्ध त्यांना ५५ भावा काढण्यात यश आले होते. नागालँडने तिन्ही सामने १० गडी राखून गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकमेवाद्वितीय विराट! टी२० क्रमवारीत पाचव्या स्थानी येताच ‘हा’ कारनमा करणारा ठरला एकमेव फलंदाज
चौथ्या टी२० सामन्यात ‘हे’ तीन भारतीय खेळाडू बसणार बाकावर? पाहा कोणाला मिळू शकते संधी
मैदानावर पुन्हा घोंगावलं ‘युवी’ नावाचं वादळ! सिक्सर किंगने एकाच षटकात लगावले ४ षटकार; पाहा व्हिडिओ






