पुणे। वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सिंहगड- राजगड- तोरणा(एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ५३ किमी गटात हिमाचल प्रदेशचा नकुल बुट्टा आणि पुण्याची चंद्रभागा कचरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सिंहगड पायथा गोळेवाडी ते तोरणा गडाच्या पायथ्याला वेल्हे गाव असे ५३ किमी अंतरात स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
सिंहगड पायथ्याला फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रविंद्र सिंघल, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदिप गारटकर, विशाल वाकडकर , तहसिलदार शिवाजी शिंदे, शांताराम इंगवले, नवनाथ पारगे, डाॅ नंदकुमार मते, निर्मला जागडे, संदिप नगिने, प्रमोद पवार पाटील,संतोष मोरे तसेच स्पर्धेचे आयोजक दिग्विजय जेधे,अनिल पवार, मारूती गोळे, महेश मालुसरे ,मंदार मते,हर्षद राव,राजेश सातपुते अमर धुमाळ ,हरिष गवई,सुजीत ताकवणे यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ४ थे वर्ष होते.
रविंद्र सिंघल आणि तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी ५३ किमी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेतील विजेत्यांना पदक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली.
अनिल पवार म्हणाले, गडकोट संवर्धन, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश स्पर्धेतून देण्यात आला. भारतातील २३ राज्यांच्या ५४ शहरातून तब्बल एक हजार १३५० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या ४०० स्वयंसेवकांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कोविडच्या काळात नियमांचे पालन करत भारतातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी आभार मानले.
सिंहगड पायथ्यालगतच्या गोळेवाडीतून मॅरेथॉन सुरू झाली. सिंहगडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजीवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला या मार्गाने वेल्हे आणि पुढे वेल्हे येथे तोरणा विद्यालयात संपली. सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी व पुन्हा पायथ्यापर्यंत अशी ११ किलोमीटरची आणि सिंहगड ते राजगड ही २५ किलोमीटरची शर्यतही झाली.
११ किमी पुरूष विजेते
प्रथम क्रमांक – साहील नाय्यर-१.१५.२३
द्वितीय क्रमांक -सचिन घोगरे -१.१९.११
तृतीय क्रमांक-आकाश लक्शरी-१.२१.५२
११ किमी महिला विजेत्या
प्रथम क्रमांक-मीना जगनाडे- १:४३.५८
द्वितीय क्रमांक -नेहा तिकम- १.४९.०८
तृतीय क्रमांक-सुकन्या बांदल- १:५२:३३
२५ किमी पुरूष विजेते
प्रथम क्रमांक – अंकीत गीरी- २:३०:३७
द्वितीय क्रमांक -विकास-२:३८:४५
तृतीय क्रमांक-संकेत गणेश वाडे-२:४१:४७
२५ किमी महिला विजेत्या
प्रथम क्रमांक -क्लेअर जन्सन-३:२४:११
द्वितीय क्रमांक- पुजा सुर्यवंशी-३:४२:०७
तृतीय क्रमांक- डाॅ आरती झवर-३:४८:३८
५३ किमी पुरूष विजेते
प्रथम क्रमांक- नकुल बुट्टा-७:५:३२
द्वितीय क्रमांक-वैभव रामतिर्थे-७:१७:५६
तृतीय क्रमांक-व्ही. आर. प्रथाप- ७.१९.४२
५३ किमी महिला विजेत्या
प्रथम क्रमांक-चंद्रभागा कचरे-९.२५.०५
द्वितीय क्रमांक-शिल्पा फडके-९.४९.०३
तृतीय क्रमांक-सुशिला कचरे-१०.०५.२४
महत्त्वाच्या बातम्या –
फॉर्म्यूला वनच्या इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यतीवर रिऍक्ट झाले सचिन, रोहित; पाहा काय म्हणाले?