टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना नामिबिया आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. गीलॉंगमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नामिबियाने श्रीलंकन संघाचा मोठा पराभव केला. उभय संघांतील हा सामना नामिबियाच्या गोलंदाजांनी गाजवला, तर दुसरीकडे श्रीलंकान फलंदाजी क्रम पूर्णपणे अपयशी ठरला. नामिबियाला मिळालेल्या या विजयानंतर चाहते दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज मॉर्ने मॉर्कल आणि त्याच्या भाऊ एल्बी मॉर्कल यांचेही कौतुक होत आहे.
मॉर्ने मॉर्कल (Morne Morkel) सध्या नामिबिया संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनात संघातील गोलंदाजांनी चांगली मेहनत घेतली असून त्याचे फळ सध्या दिसू लागले आहे. तर दुसरीकडे एल्बी मॉर्कल (Albie Morkel) नामिबिया संघाचा सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात नामिबियाने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर या दोघांचेही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
नामिबियाने यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यात धमकेदार प्रदर्शन केले आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केली. श्रीलंकन संघ या सामन्यात 55 धावांच्या अंतराने पराभूत केला. नाणेफेक कमावल्यानंतर नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 167 धावा केल्या. अष्टपैलू जॅन फ्रायलिंक () याने संघासाठी सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. या धावा करण्यासाठी फ्रायलिंकने 28 चेंडू खेलले आणि चार षटकांच्या मदतीने ही खेळी केली. स्टिफन बार्ड 24 चेंडूत 26 धावा करून दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गोलंदाजांमध्ये जॅन फ्रायलिंक, डेविड विसे, बर्नार्ड स्कॉल्थ आणि बेन शिकोंगो यांनी प्रत्येक दोन-दोन विकेट्स घेतल्या.
This is the effect of Namibia bowling coach Morne Morkel 🔥🔥
His brother Albie Morkel is their batting coach— JSK (@imjsk27) October 16, 2022
गोलंदाजांना हे उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केलेल्या मॉर्ने मॉर्कलची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीही जबरदस्त राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघासाठी एकूण 86 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 309, 188 आणि 47 विकेट्स घेतल्या आहेत. एल्बी मॉर्कलची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही चांगली राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 1 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने गोलंदाजाच्या रूपात 1, 50 आणि 26 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना या तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 58, 782 आणि 572 धावा केल्या. नामिबिया संघ भविष्यात या दोघांच्या मार्गदर्शनात असेच चांगले प्रदर्शन करत राहील असेही चाहत्यांना वाटते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
नादच खुळा! 11 वर्षीय चिमुकल्याच्या बॉलिंगचा रोहित बनला फॅन, नेट्समध्ये केला त्याचा सामना