आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना नामिबियाने जिंकला आणि स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकन संघाला मात्र मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. नामिबियाकडून श्रीलंकन संघाला पराभव पत्करावा लागल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या विजयानंतर नामबिया संघाने एका खास विक्रमाची नोंदही केली आहे.
गीलॉंगमध्ये श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना खेळला गेला. नामिबियाने हा सामना तब्बल 55 धावांच्या अंतराने जिंकला. या मोठ्या विजयानंतर नामिबिया टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा असा संघ बनला आहे, ज्यांनी टी-20 विश्वचषकात श्रीलंकेला 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या अंतराने पराभूत केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियान संघाने 2010 मध्ये अशी कामगिरी केली होती.
टी-20 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारे संघ
ऑस्ट्रेलिया (2010)
नामिबिया (2022)
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 163 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ 19 षटकांमध्ये 108 धावा करून सर्वबाद झाला. नामिबियासाठी जॅन फ्रायलिंक () याने अष्टपैलू प्रदर्शन केले आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. फ्रायलिंकने प्रथम फलंदाजी करताना 28 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. तर गोलंदाजी करातना त्याने टाकलेल्या 4 षटकांमध्ये 26 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या.
नामिबियासाठी फ्रायलिंकप्रमाणेच बेन शिकोंगो, बर्नार्ड शॉल्ट्स, आणि डेविड विसे यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकन संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयसी ठरली. कर्णधार दासून शनाकाने संघासाठी 29 धावा केल्या, पण त्यांचा दुसरा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक जिंकून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या हरमनप्रीतच्या मनात बसली ‘ही’ छोटी मुलगी, शॉट्स पाहाच
खुद्द सचिनही झाला ‘जायंट किलर’ नामिबियाचा फॅन; कौतुकासाठी वापरला हा फेमस डायलॉग






