नामिबिया क्रिकेट संघाचा कर्णधार गेरार्ड इरॅस्मस याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कसलाही मोबदला न घेता खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू कामरान अकमल (kamran akmal) याने त्याची पीएसएल फ्रेंचायझी पेशावर झाल्मीची साथ सोडली आहे. अकमलच्या या निर्णयानंतर नामीबियाच्या कर्णधाराने पीएसएलमध्ये मोफत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने पाकिस्तान सुपर लीगमधून त्याचे नाव मागे घेतले आहे. तत्पूर्वी पीएसएलच्या २०२२ हंगामासाठी पेशावर जाल्मी संघाने त्याला सिल्वर कॅटॅगरीमध्ये साईन केले होते. याच कारणास्तर अकमल नाराज झाला होता आणि त्याने स्पर्धेतून स्वतःचे नाव मागे घेतले होते.
कामरानने सांगितल्याप्रमाणे त्याच्या जागी युवा खेळाडूंना या कॅटॅगरीमध्ये खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. कामरान मागच्या सहा वर्षांपासून पेशावर संघासाठी खेळत आहे. तो म्हणाला की, “कृपया मला रिलीज करा. कारण मी या कॅटॅगरीमध्ये खेळणे अपेक्षित नाही. खालची कॅटॅगरी युवा खेळाडूंसाठी जास्त योग्य आहे. मी त्यांच्यासाठी सहा हंगामांपासून खेळत आहे, तर याचा अर्थ असा नाहीय की, मला पेशावर झाल्मीकडून सहानुभूतीची गरज आहे.”
“हा माझा अपमान आहे आणि जर अशाच प्रकारे गोष्टींचा शेवट होणार होता, तर होऊ द्या. तुम्ही एका खेळाडूला अशाप्रकारची वागणूक देऊ शकत नाही. जेवढ्या धावा मी लीगमध्ये केल्या आहेत, त्यामुळे मी यापेक्षा जास्त हक्कदार आहे,” असे अकमल पुढे बोलताना म्हणाला.
कामरान अकमलच्या या नाराजीनंतर पेशावर झाल्मी संघात एका खेळाडूची जागा नक्कीच खाली झाली आहे. त्या जागेवर नामिबियाच्या कर्णधाराने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कामरानने स्पर्धेतून त्याचे नाव माघारी घेतल्यानंतर नामिबियाचा कर्णधार र्डगेरा इरॅस्मसने ट्वीट करून खेळण्याची इच्छा जाहीर केली. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, मला संघात घ्या, मी मोफत खेळेल. त्याव्यतिरिक्त नेदरलँड संघाचा खेळाडू मॅक्सवेल ओ डेड यानेदेखील पीएसएलमध्ये कसलाही मोबदला न घेता खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, तो आनंदात खेळेल.
महत्वाच्या बातम्या –
गतविजेते बेंगलोर-एटीके विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक
फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! माजी क्रिकेटपटूला झाली अटक; जामीनही नामंजूर