टी-२० विश्वचषक २०२१ चा २१ वा सामना नामिबिया आणि स्कॉटलंड या दोन संघात पार पडला. हा सामना शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नामिबाया संघाने नाणेफेक जिंकली आणि स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नामिबियाचा गोलंदाज रुबेन ट्रम्पलमन या सामन्यात त्याच्या संघासाठी ऐतिहासिक कमगिरी केली आहे.
त्याने या सामन्यात नामिबिया संघासाठी डावाच्या पहिल्या षटकात स्कॉटलंडचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले आहेत आणि त्याच्या नावावर एक नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
नामिबियाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली असून आणि पहिल्या षटकात रुबेन ट्रम्पलमन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने या षटकात स्कॉटलंड संघाचे पहिले तीन विकेट्स घेतले. या कामगिरीनंतर तो टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमधे डावाच्या पहिल्याच षटकात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
रुबेनने या सामन्यात स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुनसे, रिची बेरिंग्टन आणि कॅलम मॅक्लिओड या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद केले आणि टी-२० मध्ये पहिल्या षटकात तीन खेळाडूंना बाद करणारा पहिलाच गोलंदाज बनला आहे.
दरम्यान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यातील या सामन्यात स्कॉटलंडने मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावाले आणि १०९ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या मायकल लियाकने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त क्रिस ग्रेविसने दोन चौकारांच्या मदतीने ३२ चेंडूत २५ धावा केल्या.
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमनने १७ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या आणि संघासाठी फायदेशीर ठरला. तसेच जान फ्रायलिंक चार षटकात अवघ्या १० धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चौफेर टीकेचे झोड उठल्यानंतर वकार युनूसने वादग्रस्त विधानाबद्दल भारतीयांची मागितली माफी
युएईत आयपीएल खेळल्याने टी२० विश्वचषकात होतोय फायदा, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने गायले गोडवे
आनंदाची बातमी! मिताली राजला खेलरत्न पुरस्कार, तर शिखरलाही मिळणार मोठा पुरस्कार