टी-२० विश्वचषकाच्या मैदानात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन बलाढ्य संघात लढत झाली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडीजवर ८ विकेट्स आणि १० चेंडू राखून विजय मिळवला. सामन्यात दक्षिण अफ्रिकेने मिळवलेल्या विजयानंतर त्यांचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किए याने प्रतिक्रिया दिली आहे. नॉर्किएने विश्वचषकापूर्वी यूएईमध्ये आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा खेळला होता. त्याच्या मते यूएईत आयपीएल खेळल्यामुळे त्याचा फायदा आता टी-२० विश्वचषकात होत आहे.
मंगळवारीने नॉर्किएने या सामन्यात त्याच्या चार षटकांच्या कोट्यामध्ये अवघ्या १४ धावा दिल्या. तसेच त्याने यामध्ये एक विकेटही घेतली. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले. दक्षिण अफ्रिका संघाला या सामन्यात मिळालेल्या विजयामध्ये नॉर्किएने महत्वाची भूमिका पार पाडली.
सामना संपल्यानंतर तो म्हणला की, “१०० % आयपीएलमध्ये खेळल्यामुळे मला खूप मदत मिळाली आहे. परिस्थिती जाणून घेण्यासाठी मला आयपीएलमधून विश्वास मिळाला. समजले की, काय करायचे आहे आणि कधी करायचे आहे. आयपीएलमुळे मला खरच खूप मदत मिळाली आहे. दुबईची खेळपट्टी चांगली होती. आयपीएलप्रमाणे ग्रिप पकडून गोलंदाजी केल्यामुळे मी काही अतिरिक्त मिश्रण करू शकलो.”
दरम्यान, सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावल्या आणि १४३ धावा केल्या. यामध्ये एव्हिन लेविसने ५६ आणि कायरन पोलार्डने २६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडीजने दिलेले १४४ धावांचे लक्ष्य १८.२ षटकात आणि केवळ २ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. एडेन मार्करमने ५१ आणि रासी वान डर डुसेनने ४३ धावांच्या दिलेल्या महत्वाच्या योगदानाच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने सामन्यात सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! मिताली राजला खेलरत्न पुरस्कार, तर शिखरलाही मिळणार मोठा पुरस्कार
माजी ऑसी यष्टीरक्षकाने सांगितली टी२० विश्वचषकातील भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी






