औरंगाबाद ।
एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आयुश भटचा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आयुश भटचा 3-6,6-0,6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत अर्जुन गोहडने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पश्चिम बंगालच्या आकराव्या मानांकीत अरुनवा मजुमदारचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत परी सिंगने तेलंगणाच्या आकराव्या मानांकीत अपूर्वा वेमुरीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या सुहिता मारुरीने तामिळनाडूच्या अनन्या एसआर हीचा 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
दुहेरी गटात उपांच्य फेरीत मुलांच्या गटात दीप मुनीम व आयुष भट या जोडीने अरूनवा मुजुमदार व अर्जुन गोहड यांचा 6-2, 6-3 असा तर आयुष्मान अरजेरिया व युवान नांदल यांनी आदित्य राठी व काहीर वारीक यांचा 4-6,7-5, 10-6 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात अपुर्वा वेमुरी व अभया वेमुरी यांनी सायना देशपांडे व ईशीता जाधव यांचा 7-5, 7-5 असा तर राधिका महाजन व अंजली राठी या जोडीने सुर्यांशी तन्वर व मधुरीमा सावंत यांचा 6-2, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी गट उपांत्यपूर्व फेरी: मुले:
युवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि.आयुश भट(कर्नाटक)(1) 3-6,6-0,6-4
अर्जुन गोहड(महा)(4)वि.वि. अरुनवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(11)6-2, 6-3
दीप मुनीम(मध्यप्रदेश)(3)वि.वि. अजय सिंग(चंदीगढ)(5) 6-2,7-6(4)
आयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)(2)वि.वि. सुखप्रीत जोजे(चंदीगढ)(7) 6-4, 6-4
एकेरी गट उपांत्यपूर्व फेरी: मुली:
सुहिता मारुरी(कर्नाटक) वि.वि. अनन्या एसआर(तामिळनाडू) 6-4, 6-4
कुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि. अभया वेमुरी(तेलंगणा)(12) 7-6(4),6-0
श्रृती अहलावत(5) वि.वि वेदा प्रापुर्ना(तेलंगणा)(4) 6-1, 6-2
परी सिंग(महा)(2)वि.वि. अपूर्वा वेमुरी(तेलंगणा)(11) 6-1, 6-2
दुहेरी गट- उपांत्य फेरी- मुले
दीप मुनीम/ आयुष भट(1) वि.वि अरूनवा मुजुमदार/अर्जुन गोहड 6-2, 6-3
आयुष्मान अरजेरिया /युवान नांदल वि.वि आदित्य राठी/काहीर वारीक 4-6,7-5, 10-6
दुहेरी गट- उपांत्य फेरी- मुली
अपुर्वा वेमुरी/अभया वेमुरी वि.वि सायना देशपांडे/ईशीता जाधव 7-5, 7-5
राधिका महाजन/अंजली राठी वि.वि सुर्यांशी तन्वर/मधुरीमा सावंत 6-2, 6-0
महत्त्वाच्या बातम्या:
–आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !
–गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा