नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज यांच्यात लढत झाली. ठाणे संघ सहाव्या क्रमांकावर होता तर नांदेड संघ सातव्या क्रमांकावर होता. दोन्ही संघांनी कोणत्याही धोका न पत्करता सामन्याला सुरुवात केली. सामन्यात गुण मिळवण्याची सुरुवात तिसऱ्या चढाई पासून झाली. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला 3-3, नऊ मिनिटा नंतर 7-7, पंधराव्या मिनिटाला 10-10 असा सामना चुरशीचा सुरू होता.
नांदेड संघाच्या अजित चव्हाण च्या चपळाई ने नांदेड संघाने ठाणे संघाला ऑल आऊट करत मध्यांतरा पर्यत 20-11 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. मध्यांतर नंतर मात्र ठाणे ने आक्रमक खेळ करत सामन्यात पुरागमन केलं. विघ्नेश चौधरी व चिन्मय गुरव यांच्या अष्टपैलू खेळीने ठाणे संघाने नांदेड संघाल ऑल आऊट करत सामना पून्हा एकदा बरोबरीत आणला. 25-25 अश्या बरोबरीत चालेल्या सामन्यात नंतर नांदेडच्या अजित चव्हाण ने आक्रमक चढाया करत तर बचावफळी जबरदस्त पकडी करत गुण मिळवले.
सामन्याच्या अंतिम क्षणी ठाणे संघावर लोनची नामुष्की आल्याने 29-38 असा पराभव स्वीकारावा लागला. नांदेड कडून अजित चव्हाण ने 15 गुण मिळवले. तर अभिषेक बोरुडे ने 4 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. ठाणे कडून विघ्नेश चौधरी ने 9 गुण तर चिन्मय गुरव ने 7 गुण मिळवत सामन्यात चुरस निर्माण केली होती. (Nanded Chambal Challengers beat Thane Hampi Heroes)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल बनला आरसीबीसाठी 1000 धावा करणारा पाचवा खेळाडू, यादीतील पहिल्या चौघांविषयी घ्या जाणून
‘तेव्हाच विराट आणि सचिनची तुलना करा…’, रिकी पाँटिंगची सर्वात मोठी प्रतिक्रिया